मुंबईत आज संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ विराट जाहीर सभा सुरु झाली असून या सभेला असंख्य जनसमुदाय जमला आहे. या सभेला नेते अजित पवार, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अस्लम शेख, सुनील प्रभू, वरुण सरदेसाई, अनिल परब, सुषमा अंधारे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ इत्यादी महत्त्वाचे नेते सभास्थळी दाखल झाले असून थोड्याच वेळात उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं भाषण सुरु होणार आहे.