सांगली – ज्योती मोरे
नाकाबंदी दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार वैभव राजाराम आवळे. वय वर्षे -25 राहणार हडको कॉलनी, मिरज आणि अमोल अशोक घोरपडे वय वर्षे 34 राहणार, मनेराजुरी, तालुका तासगाव या दोघांना सांगलीतील स्फूर्ती चौकातून गावठी कट्ट्यासह ताब्यात घेतले. पैकी वैभव आवळे हा सांगली, सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपार असल्याचे तपासा दरम्यान समजले.
त्यांच्याकडून 50 हजारांचे देशी बनवटीचे पिस्तूल, 50 हजार रुपये किमतीची एक्टिवा दुचाकी, आणि आठशे रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण एक लाख आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता भोसले, सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप साळुंखे,
पोलीस कॉन्स्टेबल संदीप गस्ते, पोलीस कॉन्स्टेबल महंमद मुलांनी, पोलीस शिपाई आर्यन देशींगकर, पोलीस शिपाई संकेत कानडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत माळी, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी ठोकळ,पोलीस कॉन्स्टेबल सचिन धोत्रे,पोलीस कॉन्स्टेबल सोहेल मुल्ला, सायबर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल श्रीधर बागडी, सहायक पोलीस फौजदार पांडुरंग भोसले आदी केली.