देशात फुले-आंबेडकर घराघरात पोहचवणारे जेष्ठ विचारवंत, साहित्यिक प्रा. हरी रामचंद्र नरके यांचे आज सकाळी हृद्य विकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईच्या एशियन हार्ट रुग्णालयात त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
ते पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते, सोबतच महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून ते सुपरिचित होते. महात्मा फुले साहित्य समितीवर त्यांनी काम केले. त्या माध्यमातून महात्मा फुले यांचे साहित्य प्रकाशित करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले होते. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा अशा अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनामुळे संशोधन, सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.