Monday, December 23, 2024
Homeराज्यसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांना डि. लीट. ने सन्मानित...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांना डि. लीट. ने सन्मानित करण्याची संधी मिळाल्याचा एमजीएमला सार्थ अभिमान – माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम…

नांदेड – महेंद्र गायकवाड

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डि.लीट. प्रदान केल्याबद्दल आंबेडकरी अनुयायांकडून महात्मा गांधी मिशनचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री कमलकिशोर कदम यांचा त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांनी केलेल्या लोककल्याणकारी कार्याची नोंद घेऊन एमजीएम विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभामध्ये अण्णाभाऊ साठे व दुसऱ्या दीक्षांत समारंभात महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डिलीट प्रदान करून त्यांचा बहुमान केला.

याच बहुमानाची दखल घेत नांदेड येथील आंबेडकरी अनुयायांनी एमजीएम प्रति कृतज्ञता म्हणून मा.कमलकिशोर कदम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. या प्रसंगी बोलत असताना कमलबाबु यांनी म्हटले की महापुरुषांचा सन्मान करण्यातच एम जी एम चा सन्मान असून ही बाब आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांनी आपल्या काव्यातून समाजाला नवीन दिशा देण्याचे महान कार्य साधले आहे. या कार्याची दखल घेण्याचे महाभाग्य आम्हाला लाभले यासारखा दुसरा आनंद नाही.

याप्रसंगी हरिहर भोसीकर, भगवान पा.आलेगावकर, मा.नानासाहेब पोहरे, ॲड.विजय गोणारकर, धनंजय सूर्यवंशी, डी.बी. जांभूळनकर, रणजीत गोणारकर., .महानंदाताई गोंवंदे, सुमनताई गच्चे आदींची उपस्थिती होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: