आलापल्लीत श्री साईबाबा देवस्थान सेवा समिती तर्फे संगीतमय भागवत कथेचे आयोजन.
अहेरी – भगवंताच्या नामस्मरणातून मोक्ष प्राप्त होते. त्यामुळे परमात्मा चे चिंतन करा. भागवत कथेच्या श्रवणाने मनाची शुद्धी होते. त्यामुळे पापातून निवृत्त करण्याचे सामर्थ्य भागवत कथेत आहे असे प्रतिपादन ह.प.भ बालयोगी गोपाल महाराज यांनी केले. आलापल्ली येथील साईबाबा देवस्थान सेवा समिती तर्फे वृंदावन धाम येथे आयोजित संगीतमय भागवत कथेचे प्रथम पुष्प गुंफताना बोलत होते.
श्री साईबाबा देवस्थानात नवरात्री महोत्सव, विजयादशमी महोत्सव साजरा करण्यात येत असून मंगळवार 17 ऑक्टोबर पासून भागवत सप्ताह सुरुवात झाली आहे. माजी पालकमंत्री अंबरीश राव, राजमाता रुक्मिणी देवी ,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार,सोनाली कंकडालवार यांनी प.पू बालयोगी गोपाल महाराजांना पुष्पहार घालून अभिवादन केले.त्यासोबत श्री साईबाबा सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंचारती ओवाळून पुष्पहार अर्पण केला.
पुढे निरूपण करताना प.पू बालयोगी गोपाल महाराज म्हणाले, आनंदाला प्रकट करण्यासाठी साधनेची आवश्यकता आहे.पापाची निवृत्ती भागवत कथेच्या श्रवणाने होते.कथेच्या श्रवणाने ब्रम्हस्वरूप प्राप्त होते.भक्ती केल्याने मुक्ती प्राप्त होते.श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. भागवत कथा श्रवणाने धर्मानुसार प्राप्त होते सत्संगाशिवाय विवेकाची प्राप्ती होत नाही. विवेकाशिवाय ज्ञान नाही ज्ञानाशिवाय आत्मसमाधान नाही, आत्म समाधान प्राप्त करण्याकरिता विवेकाची गरज आहे.
विवेकाला प्रकट करण्यासाठी ज्ञानाची गरज आहे .साधुसंताच्या संगतीने ज्ञान प्राप्ती होते भगवंताच्या नामस्मरणाने मुक्ती प्राप्त होते त्यामुळे भगवंताचे नामस्मरण करावे त्यामुळे मोक्ष प्राप्त होतो परमात्म्याचे चिंतन करा. प्रकाश, ज्ञान, वैराग्य ,तप ह्या चारही गोष्टी भागवत कथेतून प्राप्त होते त्यामुळे भागवत कथेची मोठी महिमा आहे.
रविवारला साईमंदिरात सकाळी ५ वाजता काकडा आरतीला प्रारंभ झाला असून, रविवारला देवीची मुर्ती व घटस्थापना करण्यात आली. दि. २२ ऑक्टोबर रोजी हवनकुंड रात्री ११ वाजता दुपारी २ वाजता गोपालकाला व सायंकाळी विजयादशमी प्रीत्यर्थ सायंकाळी ७ वाजता महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.
२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजता अभिषेक व आरती होणार आहे. याच दिवशी सकाळी ९ वाजता साईबाबांची पालखी आलापल्ली नगरातून काढण्यात येणार आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे. भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन साईबाबा देवस्थान सेवा समिती आलापल्लीच्या वतीने करण्यात आले आहे.