Monday, December 23, 2024
Homeराज्यनांदेड जिल्ह्यात सोमवारी दारु दुकाने बंद...

नांदेड जिल्ह्यात सोमवारी दारु दुकाने बंद…

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड जिल्ह्यात येत्या 25 मार्च रोजी धुलिवंदन उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी सोमवार 25 मार्च 2024 रोजी दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवून अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी सोमवार 25 मार्च रोजी धुलिवंदन निमित्त जिल्ह्यातील सर्व एफएल-2, एफएल-3, सीएल-3, टी.डी-1, सिएलएफएलटीओडी-3 व एफएल/बीआर-2 अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असेही आदेशात नमूद केले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: