Sunday, December 22, 2024
Homeराज्यहिवरखेड येथे दारू विक्रेत्यावर छापा…२६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त…दोघांना अटक…गुन्हा दाखल…

हिवरखेड येथे दारू विक्रेत्यावर छापा…२६ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त…दोघांना अटक…गुन्हा दाखल…

आकोट – संजय आठवले

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे अवैध दारू विकत असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट यांचे कार्यालयात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू खर्चे आणि पोलीस अंमलदार संतोष म्हात्रे यांनी छापा घातला. त्यावेळी अंबादास फोपसे यांचे हॉटेल नजीक आकाश गणेश दूतोंडे वय २८ वर्षे आणि दत्ता सुधाकर आमले वय २५ वर्षे दोघेही राहणार इंदिरानगर हिवरखेड यांना अटक करण्यात आली.

त्यांचेकडून १८० एम एल चे देशी दारूचे ९६ क्वार्टर्स हस्तगत करण्यात आले. त्यांचे बाजार मूल्य ६ हजार ७२० आहे. त्यासोबतच २० हजार रुपये किमतीची एक मोटरसायकलही जप्त करण्यात आली.

हिवरखेड पोलीस ठाण्यात सदर कारवाईची फिर्याद सहायक पोलीस निरीक्षक राजू खर्चे यांनी दिली. त्यावरून हा सारा मुद्देमाल जप्त करून सदर दोन्ही आरोपींवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महादेव नेवारे हिवरखेड हे करीत आहेत. सदरील कारवाई आकोट येथे नव्यानेच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: