दिपक सदाफळे यांच्या सारखी समाजातील व्यक्ती जेव्हा जातपात धर्म न पाहता ज्यावेळी इतर समाजातील लोकांना संकटकाळी जिवरक्षक सेवा रुग्णसेवा आणी आपत्ती व्यवस्थापन सेवा देऊन आपल्या कार्यातुन नावलौकिक निर्माण करणा-या संकटमोचकाचा 8 नोव्हेंबर रोजी दुपारी अकोला येथील रणपिसे नगरातील बाराज्योतीर्लींग मंदीर सभागृहात अ.भा. मा.म.महिला आघाडी अकोला तर्फे समाजातील सक्रिय व सामाजिक कार्यात 23 वर्ष झाले निरंतरपणे प्रतिकुल परिस्थितीवर मात करत सदैव अग्रेसर असलेले पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन महाराष्ट्र द्वारासंचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांना अकोला जि.प.अध्यक्षा संगीताताई अढाऊ अकोला म.न. पा.मा.नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई म्हसने यांच्या प्रमुख उपस्थितीत समाजरन्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजीका श्रीमती वनीताताई राऊत आयोजन समीती श्रीमती सुमीत्राताई निखाडे,सौ भारतीताई शेंडे,सौ कल्पनाताई तायडे,सौ माधुरीताई दाते,सौ मायाताई ईरतकर,सौ वैशालीताई राहाटे.तसेच अखील भारतीय माळी महासंघ,महिला आघाडीच्या सदस्या उपस्थित होत्या.अशी माहिती श्रीमती वनिताताई राऊत यांनी दीली.