सांगली – ज्योती मोरे
दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील बावीस लाख नोंदीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी दहा हजार रुपये बोनस देण्यात यावा, यासाठी आज महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांना निवेदन देण्यात आलाय.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी मुंबईला जाणार आहे .सदर शिष्य मंडळात कॉम्रेड शंकर पुजारी,संजय खानविलकर, सुभाष लोखंडे, कॉम्रेड विशाल बडवे, कॉम्रेड संतोष बेलदार ,नासिर बारगीर, जितेंद्र ठोंबरे, विनोद पानबुडे, बाबासाहेब पाकजादे,सोनाली चव्हाण, विद्या भोरे ,शांताबाई चव्हाण ,अमोल माने, दत्ता लोहार आणि सुरेश सुतार आदींचा समावेश आहे.