रामटेक – राजु कापसे
रामटेक :- नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकीचे निकाल घोषित झाल्याने तेलंगणा राज्यात सत्ता परिवर्तन होऊन भारत राष्ट्र समितीचा पराभव झाल्याने या पराभवास खचुन न जाता महाराष्ट्रात अधिक जोमाने काम करुन आमचे नेते मा के चंद्रशेखर राव यांचे पाठीशी सक्षमपणे उभे राहू असे वक्तव्य भारत राष्ट्र समिती पूर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी केले आहे.
तेलंगणा राज्य संयुक्त आंध्रप्रदेशात असतांना देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या या राज्यात होत असतांना तेलंगणा वेगळा प्रदेश होण्यासाठी मा आमचे नेते के चंद्रशेखर राव यांनी आंदोलन उभारुन २०१४ ला वेगळा तेलंगणा राज्य निर्मिती करून घेत राज्यात बी आर एस ची सरकार स्थापन करुन शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची दखल घेत अनेक योजना राबविण्यात कोणत्याही प्रकारची कसर सोडली नाही.
त्यामध्येशेतकऱ्यांना चोवीस तास विनामूल्य वीज पुरवठा असो की शेतकऱ्यांना प्रती एकर सरसकट विनापरतावा दहा हजार रुपये अर्थसहाय्य,कृषी साहित्य खरेदीसाठी ९५% सूट,सिंचनाकरिता लिफ्टद्वारे मुबलक पाणी पुरवठा, वर्षभरात शेतमाल खरेदीसाठी खरेदी केंद्र,शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे विमा कवच, अपंग, विधवा, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून भरीव मदत,परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विनापरतावा २० लक्ष रुपये अनुदान,
बेरोजगार युवकांना उद्योगाकरिता विनापरतावा १० लक्ष रुपये अर्थसहाय्य,घरकुल बांधकाम करण्यासाठी अडीच लाख रुपयांची तरतूद अशा एक ना अनेक लोकोपयोगी योजना राबवून अल्पावधीतच मा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी संपूर्ण देशात तेलंगणा राज्याची मॉडेल स्वरूपात ओळख निर्माण करुन दिली.
असे असतांना तेलंगणा राज्य निर्मिती पासुन सतत दहा वर्षात राज्य सरकारचे नेतृत्व करीत असतांना कदाचित आंतरीक मतभेद निर्माण झाल्याने असे निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.तेलंगणा राष्ट्र समितीचे भारत राष्ट्र समिती म्हणून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करून राष्ट्रीय पक्षाचे नावानुसार राष्ट्रीय चिन्हावर पहिलीच निवडणूक असुन अपेक्षित परिणाम मिळाले नसले तरी आमचे नेते मा के चंद्रशेखर राव यांनी जनमताचा आदर करुन पराभवाचा स्वीकार करत येणाऱ्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्यामुळे तेलंगणा राज्यातील निवडणुकीचे परिणाम लक्षात घेता आणि मा के सी आर साहेबांच्या ध्येयवादी धोरणाचा विचार करुन या अपयशाला न घाबरता महाराष्ट्र राज्यातील स्थानिक समस्या व प्रश्नांवर लक्ष केंद्रित करुन आगामी निवडणुका अधिक जोमाने लढण्याचा निर्धार करत के चंद्रशेखर राव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु अशी माहिती पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी दिली आहे.