शीतल करदेकर
कलाकार व सर्व संबंधित रंगकर्मी यांचे बोर्ड तयार झाल्याबाबत त्याचे महत्त्वाचे श्रेय पत्रकार यांना जाते, त्यांनी सतत पाठपुरावठा केला म्हणून हा चांगला दिवस आज कलाकार / तंत्रज्ञ यांना पाहायला मिळणार..! कलाकारांनी हा लढा उभारला त्यांचे योगदान सर्वात मोठे,महत्त्वाचं म्हणजे या लढ्यात मी मी म्हणणारे कलाकार आणि मोठ्या संस्थाचे पदाधिकारी सहभागी झाले नाहीत! त्याचे तर जास्त आभार !
मा. डॉ नीलमताई गोऱ्हे,(उपसभापती विधानपरिषद) कोरोना काळात असंघटित कामगारांसाठी सातत्याने काम करत होत्या ! त्यावेळी मा नीलमताईना सर्वप्रथम निवेदन देऊन असंघटित कामगार म्हणून चित्रपट/ नाट्य / मालिकेतील सर्व संबंधित लोकांची नोंदणी होऊन त्यांचेही असंघटित कामगार म्हणून मंडळ व्हावे असे निवेदन मी दिले होते, तसेच कामगार व सांस्कृतिक मंत्र्याकडेही पाठपुरावा केला! आज खूप छान वाटतय! मा नीलमताई, मा अमित देशमुख व तत्कालिन कामगार मंत्री यांचे आणि यासाठी काम करणाऱ्या सांस्कृतिक, कामगार व इतर सर्व विभागातील अधिकारी,कर्मचारी यांचे आभार मानायलाच हवेत!