काटोल येथे स्वीप कार्यक्रम संपन्न
नबीरा महाविद्यालय, काटोल येथे निवडणुकीचा जागर
नरखेड – अतुल दंढारे
संपूर्ण जगात भारतीय लोकशाही मोठी व विश्वसनीय आहे. निवडणूका हा लोकशाहीचा उत्सव असतो. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून ‘स्वीप’ कार्यक्रम घेण्यात आला. मतदान जनजागृती करून निवडणूकीतील सहभाग वाढवून ‘भारतीय लोकशाही’ बळकट करूया असे प्रतिपादन जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी (स्वीप) सौम्या शर्मा (भाप्रसे) यांनी नबीरा महाविद्यालय, काटोल येथील स्वीप कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी (स्वीप) सौम्या शर्मा (भाप्रसे) तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक अधिकारी शिवराज पडोळे, गटविकास अधिकारी कुशल जैन (भाप्रसे), सहा. गटविकास अधिकारी रामदास गुंजरकर, नगर परिषद मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
मतदार जागरूकता व सहभाग (स्वीप) कार्यक्रमातंर्गत प्रभातफेरी व सायकल रॅली काटोल शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. त्यानंतर नबीरा महाविद्यालय येथे स्वीप कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता.तेथे बी. आर. हायस्कुल, काटोल व नगर परिषद हायस्कुल, काटोल येथील विद्यार्थ्यांनी ‘मतदान जनजागृती’ करिता पथनाट्य सादर करून रसिकांची वाहवाह मिळविली.
स्वीप कार्यक्रमातंर्गत शिक्षण विभागातर्फे शाळास्तरावर चित्रकला, निबंध, घोषवाक्य, रांगोळी, पथनाट्य स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या त्यातील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहा गटविकास अधिकारी रामदास गुंजरकर, संचालन शिक्षक राजेंद्र टेकाडे तर आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षण विस्तार अधिकारी राजू धवड,शिक्षण विस्तार अधिकारी नरेंद्र बोढाळे, शिक्षण विस्तार अधिकारी पांडुरंग भिंगारे, केंद्रप्रमुख रामभाऊ धर्मे, केंद्रप्रमुख सुरेंद्र कोल्हे, कॅप्टन डॉ. तेजसिंग जगदळे, प्रा.परेश देशमुख, प्राचार्य विजय राठी, प्राचार्य प्रभाकर भस्मे, उपप्राचार्य राठोड आदींनी सहकार्य केले.