आज संपुर्ण महाराष्ट्र मध्ये, सर्व देशात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आदराने घेतले जाते, त्यांचा इतिहास वाचला जातो शिकवलं जातो,अजूनही महाराज यांच्यावर संशोधन सुरू आहे की एवढे मोठे महाराज घडले, मोठं मोठे किल्ले जिंकले कसे? एवढे मावळे जमवले कसे ?
आणि आज त्याच महाराजांच्या महाराष्ट्र मध्ये , मुंबईत त्यांचे नाव आदराने न घेता , कोणत्याही पाटीवर , मैदानाला , रस्त्याला एकेरी नाव देऊन महाराजांचा आपण सर्वजण अपमान करत आहोत असे नाही वाटत का या राजकीय लोकांना ? का शासन आदेश देत नाहीत की यापुढे आपल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे नाव संपूर्ण लावा म्हणून….!
कुठे गेले महाराजांना मानणारे महाराज यांच्या जन्मदीवशी व पुण्यतिथी ला मुजरा करणारे मावळे, का जागे होत नाहीत ? का आपल्या प्रत्येक विभातील नगरपालिका , ग्रामपंचायत,जिल्हाधिकारी,आमदार खासदार , नगरसेवक ,दुकानदार, यांना सांगून महाराज यांचे एकेरी नाव काढायला लावत ?
महाराज यांच्या पेक्षा आपण कोणी मोठे नाही आहोत, राजकिय लोक महाराज यांच्या नावाने पोळी भाजून घेतात पण त्याचे एकेरी नाव सर्वत्र लावले आहे ते बदलेल असे कृत कोणी करायला पुढे येत नाही ? आता जनतेने आवाज उठवला पाहिजे , जनतेने बोलले पाहिजे ! चला विरोध करूया , महाराज यांचे एकेरी नाव दिसेल तिथे जाऊन विनंती करूया, महाराज यांचे संपूर्ण नाव छत्रपती श्री शिवाजी महाराज असे नाव लिहिण्यास सांगूया…!