Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayप्रकाश भाऊ…या आपण एकत्र लढू...विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आंबेडकरांना घातली...

प्रकाश भाऊ…या आपण एकत्र लढू…विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आंबेडकरांना घातली साद…

शेगाव : (प्रतिनिधी) दि ७ पुरोगामी विचाराच्या पक्षाने बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचे हे राज्य आहे. अश्या या राज्यामध्ये ते जन्मले, स्वराज्याची स्थापना केली. मला वाटतं की पुरोगामी विचाराच्या मंडळींनी एकत्र येणे आणि तो सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जातीवादी शक्तीला घालवणं हा जर पर्याय असेल आणि जर त्यांचा उद्देश असेल सगळ्यांचा तर एकत्र येऊ शकतात. परंतु जातीवादी शक्तीला मदत करण्याचा कोणाचा काही इरादा असेल तर त्यामध्ये आम्ही कितीही आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र तोडण्याचा प्रयत्न होईल. म्हणून आमचा प्रकाश भाऊ आंबेडकरांना एक विनंती आहे आवाहन आहे, विनंती आहे, सूचना आहे की, आपण एकत्र लढू पुरोगामी विचारायला घेऊन पुढे जाऊन महाराष्ट्रातून जातीवादी शक्तीला बाहेर घालवू यासाठी अशी साद राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी घातलीय… गुरुवारी ते शेगावात ते पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा सुरु आहे. हि यात्रा बुधवारी बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली होती. दरम्यान वडेट्टीवार हे रात्री विशेष निमंत्रणावर काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले यांच्या निवासस्थानी भोजनासाठी आले होते. यानंतर मौक्कमी राहून आज गुरुवारी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ते अकोट कडे रवाना झाले दरम्यान इंडिया च्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांना निमंत्रण गेलं नाही असे पत्रकारांनी विचारले असता वडेट्टीवार म्हणालेत कि, ती काही सत्यनारायणाची पूजा वगैरे नव्हती, निमंत्रण द्यायला, त्यांनी सहमती दर्शविणारे पाऊल उचलालयलापाहिजे होते. तर आपण निमंत्रण देतो. आम्ही निमंत्रण द्यायचं त्यांनी नाही म्हणायचं म्हणजे असं कोणी करेल का ? त्यांच्याकडून कुठलातरी एक पाऊल पुढे आला की आम्हाला इंडिया बरोबर यायचं आहे. तर पुढच्या बैठकीला त्यांना निमंत्रण नक्कीच मिळेल, बैठक पण त्यांच्याकडूनच काही आलं नाही तर कोणी स्वतःहून निमंत्रण देणार नाही. असेहि ते म्हणालेत.

राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करीत आहेत, यासंदर्भात छेडले असता ते म्हणले कि, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निजाम काळातील नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र यावर विरोधी पक्षनेते विजय यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी नवीन असं काहीही केलेलं नसून जुन्या बाटलीला नवीन लेबल लावल असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत.. EWS च आरक्षण न मागता दिलं होत तर मराठ्यांना त्याच धर्तीवर आरक्षण देण्यासाठी लाज वाटते का ? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याच बरोबर जालना येथे झालेल्या लाठी हल्ल्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रायच्चीत केलं पाहिजे असंही ते म्हणालेत. EWS च आरक्षण कोणी मागितल होत का ? कोणी रस्त्यावर उतरलं होत का ? EWS च्या धर्तीवर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी लाज वाटते का ? असा संताप सवाल हि त्यांनी यावेळी उपस्थित केला. “राजकारण आम्ही नव्हे तर तुम्ही करत आहात” त्यावेळी 28 पैकी 18 लोक आमच्याबरोबर होते.. तेव्हा तुम्ही झोपला होतात का ? तेव्हा तुम्हाला कोरोना झाला होता का ? असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. आरक्षण द्यायची तुमची नियत असेल तर झटक्यात प्रश्न सुटेल असेही विजय वडेट्टीवार म्हणालेत.

यावेळी त्यांच्या सोबत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रामविजय बुरुंगले, जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाच्या नेत्या सौ. स्वातीताई वाकेकर, माजी आमदार कृष्णराव इंगळे,श्याम उमाळकर, डॉ. अभय पाटील आदींची उपस्थिती होती.

वडेट्टीवार यांचे संतनगरीत जोरदार स्वागत…

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून देशभरामध्ये सध्या जनसंवाद यात्रा सुरू आहेत यामध्ये विदर्भातील पश्चिम विदर्भामध्ये जनसंवाद यात्रा काढण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे त्यानुसार ही यात्रा मराठवाड्यातून काल बुधवारी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा चिखली व बुलढाण्यात दाखल झाली होती. दरम्यान सायंकाळी वजेट्टीवार हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रामविजय बुरुंगले यांच्या निवासस्थानी भोजनासाठी शेगाव दाखल झाले होते यावेळी बुरुंगले परिवार आणि शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने वडेट्टीवार यांचे जंगी स्वागत सत्कार करण्यात आले फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी यावेळी बुरुंगले यांच्या निवासस्थानासमोर करण्यात आली. यानंतर रामविजय बुरुंगले, प्राचार्य सौ. मीनाक्षीताई बुरुंगले, डॉ शाम बुरुंगले, काँग्रेस नेते धनंजय देशमुख, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव बुरुंगले माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय काटोले, शहराध्यक्ष किरणबापू देशमुख, अविनाश उमरकर, राजेंद्र वानखडे, संजय ढगे, बुडन जमादार फिरोज खान सय्यद हाशम, सय्यद नासिर, कुरेशी आदींनी वडेट्टीवार यांचे स्वागत सत्कार केले. मोठ्या प्रमाणावर स्वागत सत्कारामुळे वडेट्टीवार हे भारावून गेले होते.

फोटो – विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करतांना काँग्रेस नेते रामविजय बुरुंगले, सौ.मीनाक्षीताई बुरुंगले, डॉ. शाम बुरुंगले आदी.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: