Monday, December 23, 2024
Homeराज्यकट्टा येथे विधी सेवा व शाशकीय योजना महाशिबीर संपन्न, महाशिबीराला न्यायाधिश, जिल्हाधिकारी,...

कट्टा येथे विधी सेवा व शाशकीय योजना महाशिबीर संपन्न, महाशिबीराला न्यायाधिश, जिल्हाधिकारी, सिईओ, एस.पीं. ची हजेरी…

शिबीरात मान्यवरांनी दिली विधीसेवांसह विविध शाशकीय योजनांची माहिती

विविध योजनांमार्फत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, वाहन – घरकुलच्या चाव्यांचे वितरण

रामटेक – राजु कापसे

राष्ट्रीय विधी सेवा प्राधीकरण नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नागपुर, उच्च न्यायालय विधी सेवा उप समिती नागपुर खंडपिठ नागपुर तथा जिल्हाधिकारी कार्यालय नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय जनजागृत अभियान ‘ नागरीकांचे कायदेविषयक सबलीकरण व हक हमारा भी तो है @ ७५ ‘ अंतर्गत विधी सेवा व शाशकीय योजना हे भव्य महाशिबीर आज दि. १३ नोव्हेंबर ला सकाळी १०.३० वाजता तालुक्याच्या आदिवासीबहुल भागातील कट्टा गावातील गोंडवाना सांस्कृतीक भवन येथे मोठ्या थाटात पार पडला.

याप्रसंगी प्रामुख्याने वरिष्ठ प्रशासकिय न्यायमुर्ती श्री. सुनील शुक्रे, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर श्री एस बी अग्रवाल, श्री विजेंदर कुमार कुलगुरू महाराष्ट्र राज्य विधी विश्वविद्यालय नागपूर, श्री जगदीप पांडे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण डॉक्टर विशाल आनंद शिंगोरी, श्री प्रभुनाथ शुक्ला मुख्य वन संरक्षक नागपूर, श्रीमती वंदना सवरंगपते एस डी ओ रामटेक आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.

आज दिनांक 13 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा दरम्यान या भव्य महा शिबिराला सुरुवात झाली प्रमुख पाहुण्यांचे आगमन झाल्यावर त्यांचे गोंडी नृत्य सादर करून स्वागत करण्यात आले यानंतर उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत आयोजकांनी त्यांचे स्वागत सत्कार केला यानंतर उपस्थित मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली यामध्ये सुरुवातीला जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचेसह विविध मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणे झाली जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत त्याची अंमलबजावणी सुरू आहे.

असे उपस्थित त्यांना सांगितले यानंतर सरते शेवटी वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती श्री सुनील शुक्रे यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले त्यांनी यावेळी उपस्थित विशेषतः आदिवासी लोकांना मार्गदर्शन करताना अन्यायाबददल जागृकता निर्माण करणे हा या कार्यक्रमच्या मागचा उद्देश असुन, विधी सेवेबाबद जागृतता निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे सांगितले तसेच विधीसेवेबाबत विविध अत्यावश्यक माहिती उपस्थित त्यांना दिली.

न्यायमूर्तींचे भाषण आटोपल्यावर उपस्थित सर्व मान्यवरांनी महा शिबिरामध्ये लावण्यात आलेल्या विविध विभागाच्या स्टॉल ला भेट देत माहिती जाणून घेतली तथा या स्टॉल मधून नागरिकांची कामे होतील काय याची पडताळणी केली यानंतर कार्यक्रम संपुष्टात आला. कार्यक्रमाचे संचालन गौरी जांगडे देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी महसूल श्रीमती वंदना सवरंगपते यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये तहसिलदार बाळासाहेब मस्के, डिवायएसपी आशीत कांबळे,

आर.एफ.ओ. मंगेश ताटे, देवलापार आरएफ ओ विशाल पाटील, आर एफ ओ राहुल शिंदे, सपोनी देवलापार बोरकुटे, तालुका कृषी अधिकारी दिनेश भोये, तालुका आरोग्य अधिकारी चेतन नाईकवार, शांता कुमरे, हरीष उईके, सुधीर नाखले, उमेश भांडारकर, पुरवठा निरीक्षक आतिश जाधव, ग्रामसेवक भारत वेट्टी, नारायण कुंभलकर, पंडीत देवकर, नगराळे यांचेसह विविध विभागातील अधिकारी – कर्मचारी तथा नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांसह चाव्यांचे वितरण
शिबीरादरम्यान उपस्थित विविध मान्यवरांकडुन विविध योजनांमार्फत लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, ट्रॅक्टर वाहनाच्या चाव्या, राशन कार्ड, संजय गांधी योजना, भुमीअभिलेख विभाग अर्तगत सनद वाटप, पं. स . अंतर्गत आवास योजना घरकुल वाटप चावी, जॉब कार्ड वाटप, कर्ण मशीन, वनविभाग मार्फत शेतपिक नुकसान व पशुहानी साठी धनादेश, विद्युत मिटर आदींचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे गोंडी नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: