Sunday, December 22, 2024
Homeराज्यचंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्स ची कायदेशीर चौकशी करा - नरेंद्र सोनारकर...

चंद्रपूर जिल्ह्यातील OYO हॉटेल्स ची कायदेशीर चौकशी करा – नरेंद्र सोनारकर…

बल्लारपूर – नरेंद्र सोनारकर

उडिसा च्या रितेश अग्रवाल यांनी 2013 मध्ये स्थापित केलेले ओयो हॉटेल चे भारतभर स्थापत्य झाले.हजारो ओयो ची सरकारी ठायी नोंदही झाली.मात्र नियमांची ऐशी तैशी करून गल्ली बोळात बुजगावण्या सारखे निर्माण होणारे ओयो हे कापल्स ला शरीरसुख भोगण्यासाठीचे अड्डे बनले आहे.

परिणामता फक्त नफा कमविण्याच्या उद्देश असल्याने ओयो संचालक मूळ कागद पत्रांची पृष्टी न करता रूम देतात.ज्यात काही अल्प वयीन मुली बळी पडतात.त्यामुळे जिल्यातील सर्वच ओयो हॉटेल्स ची कायदेशीर चौकशी करून बेकायदेशीर ओयो हॉटेल्स ला सील ठोकण्यात यावी,अशी मागणी पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकातून केली आहे.

बल्लारपूरार नुकतीच एक दुर्दैवी घटना बल्लारपुरात घडली असून,ओयो संचालकाच्या अक्षम्य चुकीमुळे एका अल्प वयीन मुलीवर बलात्कार झाला.आणी बदनामी मुळे त्या पीडित मुलीलाच आत्महत्या करून तिला आपला जीव गमवावा लागला….
चंद्रपूर जिल्ह्यातिल अनेक शहरात हे ओयो हॉटेल्स गल्ली बोळात उभारले गेले याची परवानगी घेण्यात आली आहे का?

याची संबंधित विभागा मार्फत कायदेशीर चौकशी होणे महत्वाचे आहे. कारण बल्लारपूर येथील घटना उघडकीस आल्या नंतर इतर हॉटेल्स मध्ये असले प्रकार घडत नसतील,हे कशावरून..? असा प्रश्न सोनारकर यांनी उपस्थित केला आहे.या संबंधाने पुरोगामी पत्रकार संघाचे एक शिष्ट मंडळ लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आज राज्यातच नव्हे देशात वासनाअंधांनी कळस गाठला आहे.आई,बहिणी सह 4- 5 वर्षाच्या चिमूरड्या ही सुरक्षित नाही…अशा भिषण अवस्थेत,पोलीस विभाग,पालक वर्ग,शिक्षक वर्ग,आणी जागरूक नागरिकांनी अशा घटनेला लगाम लावण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असेही आवाहन पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक नरेंद्र सोनारकर यांनी केले आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: