रामटेक – राजु कापसे
रामटेक येथे आज डी मल्लिकाजुर्ण यांच्या नेतृत्वात शांती मंगल कार्यल्यापासून हजारो च्या संख्येत तहसील कार्यलयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रामटेक विधानसभातील पांधन रस्त्याने त्रस्त शेतकरी, मजूर, बेरोजगार युवक, रखडलेला तीर्थक्षेत्र विकास, कोरडवाहू क्षेत्र सिंचन, वनशेत्र आदिवासी 42 गावांना वाघामुळे बळी पडणारी जनता, घरकुल पासून वंचित असणारे बेघर लोक,
मागील 7 वर्षांपासून महाराष्ट्र खनिक्रम विकास महामंडळ युवकांना कसलाही रोजगार उपलबध केलेला नाही ,कृषि उत्पन्न बाजार समिती चा उपबाजार सुरु करण्यात यावा,सोयाबीन व कापूस ला आधारभूत किंमत जाहीर करावी,भ्रष्टाचारमुळे त्रस्त जनतेच्या समस्याचे निराकारण व समस्या विषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , उपविभागीय अधिकारी रामटेक यांचा मार्फत निवेदन देण्यात आले. त्यानंतर शांती मंगल कार्यलय येथे सभा घेण्यात आली.
मोर्च्या व सभे दरम्यान मोर्चा व संवाद सभेला माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष राजेश ठाकरे उपसभापती नरेंद्र बंदाटे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य व्यंकट कारेमोरे जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे, विजय हटवार, पंचायत समिती सदस्य नरेश मेश्राम, मा. न. पा. उपाध्यक्ष आलोक मानकर,
मा. न. पा. सभापती संजय बिसमोगरे शहर अध्यक्ष उमेश पटले, रवी चव्हाण, रेखा दूनेदार, सागर गावंडे, सागर लोंढे, सुखदेव शेंद्रे, मा. न. पा. सदस्य चित्रा धुरई, नेहा गावंडे, संजय अजबिले, योगेश मात्रेनंदलाल बावनकुळे, फजित सहारे, कुणाल कांबळे, गणेश बगमारे, हेमंत जैन, केशव मेहर, वसंता कोकाटे व मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष उपस्थित होते.