रामटेक – राजू कापसे
जागतिक बालिका दिन निमित्त शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह रामटेक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, (बार्टी) पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प तालुका रामटेक यांच्या वतीने ‘तरूणाईचे सुरक्षात्मक कर्तव्ये व जबाबदारी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.रामटेक तालुका समतादूत राजेश राठोड यांनी विद्यार्थीनींना सुरक्षात्मक नियम, दैनंदिन जीवनात घ्यावयाची काळजी, जबाबदारी व कर्तव्ये याबाबत चर्चात्मक मार्गदर्शन केले. संचलन विद्यार्थीनी किरण वरखडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाच्या गृहपाल कु.शिल्पा मेश्राम ह्या होत्या.त्यांनी विद्यार्थीनींना जागतिक बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या व आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला.आभार कल्याणी महाजन यांनी मानले.
सदर उपक्रमासाठी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, निबंधक इंदिरा अस्वार, विभागीय प्रकल्प अधिकारी जागृती गायकवाड व नागपूर जिल्हा प्रकल्प अधिकारी ह्रदय गोडबोले यांनी मार्गदर्शन केले.