चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
बल्लारपूर येथे ओबीसींची महापरिषद व ओबीसी योद्धांचा सत्कार तसेच प्रसिद्ध वक्ते प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.दि. 14 ऑक्टोबर सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजता बल्लारपूर येथील राजे बल्लाळशा नाट्यगृहामध्ये ओबीसींची एक दिवसीय महापरिषद आयोजित करण्यात आली आहे.
त्याकरिता मुख्य व्याख्याते म्हणून प्रसिद्ध विचारवंत राजकीय विश्लेषक तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्याम जानव हे “संविधान बचाओ ! महाराष्ट्र बचाओ !!” या मोहिमेंतर्गत भारताचे संविधान आणि आजच्या ओबीसींची दशा व दिशा या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. सदर ओबीसी महापरिषदेला आमदार सुधाकरजी अडबाले हे उद्घाटक म्हणून तर आमदार अभिजीतजी वंजारी अध्यक्ष म्हणून लाभले आहेत.
तसेच इतर उपस्थितीमध्ये प्रामुख्याने श्री दशरथ मडावी- संविधान विचारवंत डॉ. दिलीप कांबळे, डॉ. रजनी ताई हजारे, मां विजय नळे प्रा. रामभाऊ महाडोरे, एडवोकेट मेघा भाले, राहुल सोमनकर, मेहबूब खान पठाण तसेच ओबीसी व बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.तरीही मोठ्या बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी परिषदेचे आयोजक व बहुजन समता पर्व तसेच भारतीय ओबीसी महापरिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे यांनी कळवले आहे.