Monday, December 23, 2024
Homeराज्यश्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्त यु.पी.एस.सी,एम.पी.एस.सी.करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समीर...

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान च्या वतीने द्वितीय वर्धापन दिनानिमित्त यु.पी.एस.सी,एम.पी.एस.सी.करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समीर वानखेडे यांचे व्याख्यान…

सांगली – ज्योती मोरे.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सांगलीतील डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग हॉलमध्ये सकाळी दहा वाजता आय आर एस समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा आयोजन करण्यात आले आहे.

याच दिवशी सायंकाळी सहा वाजता याच हॉलमध्ये आय आर एस समीर वानखेडे, भाजपा युवा नेते मोहित कुंभोज ,रोड मराठा पानिपतचे राम नारायण मराठा,शौर्य समिती पानिपतचे अध्यक्ष प्रदीप पाटील, 26/ 11 हल्ल्यामधील प्रमुख साक्षीदार देविका रोटवन, पालकमंत्री सुरेश खाडे,खासदार संजयकाका पाटील,आमदार सुधीरदादा गाडगीळ,

महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उद्योजक मनोहर सारडा, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,शिव प्रहार प्रतिष्ठानचे सुरज भाई आगे, आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करणार असल्याची माहिती आज हॉटेल हनुमान मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: