Thursday, September 19, 2024
Homeराज्यकै.सुरजमल लुंकड यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री.भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान...

कै.सुरजमल लुंकड यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री.भास्कर पेरे पाटील यांचे व्याख्यान…

सांगली – ज्योती मोरे

सुरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मध्ये कै. सुरजमल लुंकड यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री .भास्कर पेरे पाटील आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत पाटोदा. “असा घडला आदर्श गाव” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी श्री भास्कर पेरे पाटील अध्यक्ष सौ. तृप्ती दोडमिसे (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली.) संस्थापक श्री. प्रवीण लुंकड, सचिव एन जी कामत, स्कूल कमिटीचे चेअरमन डॉक्टर यशवंत तोरो,

संचालिका सौ. संगीता पागनीस मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार तसेच उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते सुरजमलजी लुंकड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण लुंकड यांनी केले. कै. सुरजमलजी लुंकड यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्य कर्तुत्वाचा अल्पसा परिचय करून दिला.

सुरज फौंडेशन ही संस्था समाज उपयोगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. आजचा पिढीस कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम शिकवणे का गरजेचे आहे याबाबतही आपले विचार मांडले. शिक्षणाबरोबरच आदर्श ग्रामविकास होण्यासाठी शासनाकडे काही सवलतीची अपेक्षा न करता स्वतःच्या हिमतीवर सोयी सुविधा तयार करून गाव स्वावलंबन कसे बनेल याचे याकडे लक्ष द्यावे असे मत मांडले.

सौ. तृप्ती दोडमिसे यांनी आपल्या मनोगतातून स्वयंभू आदर्श गाव कसा घडवायचा याचे ज्वलंत उदाहरण पाटोदा गावाकडून घ्यावा. आपल्या अथक परिश्रमातून यश नक्कीच मिळतं. प्रमुख अतिथी आदरणीय श्री. भास्कर पेरे पाटील यांनी असे सांगितले की पाटोदा गाव शून्यातून कसा निर्माण झाला यासाठी सरपंच म्हणून कोण जिंकून आल यापेक्षा जिंकून आल्यानंतर कोण काय करतं हे जास्त महत्त्वाचे आहे.

देशाचे राजकारण जातीवर न करता विकासावर व्हावे असे केल्यास देश महासत्ता होईल प्रत्येक गावात विकासाच्या आड येणाऱ्या प्रवृत्ती असतात त्यामध्ये निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार आघाडीवर असतात अशा प्रवृत्ती दुर्लक्षित करूनच विकास साधला पाहिजे.आपल्या गावचा माणूस शंभर वर्ष कसा जगेल.

कठीण काम सोपे कशा पद्धतीने करता येईल व यासाठी कोणत्या सुविधा राबवण्यात आल्या याचे रंजक , रोचक माहिती, अनुभव आणि विनोदी किस्से आपल्या भाषण शैलीतून व्यक्त केले.छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज यांच्या सारख्या अनेक उदाहरणातून त्यांनी केलेल्या आचरणातून आपल्या कार्याचा उपस्थितांना उत्कृष्टपणे संवादरुपी मार्गदर्शन केले.

मराठी माध्यमचे मुख्याध्यापक श्री. अधिकराव पवार सर यांनी सुरज फौंडेशन सामाजिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात आपल्या नावाचा जयघोष करते याबरोबरच प्रत्येक उपक्रमामध्ये नाविन्यवत असे कार्य संस्था करीत असते जीवनात ग्रामपंचायत शिवाय नगरपालिका शिवाय जीवनच असू शकत नाही असे सांगून उपस्थित मान्यवरांचे आभार मानले सुरजमलजी लुंकड यांच्या चाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.

यावेळी संस्थेतील सर्व पदाधिकारी शिवसेना संघटक श्री बजरंग पाटील ,बन्सीकाका ओस्तवाल ,रघुनाथ सातपुते, अश्विनी माने, मल्टीस्किल विभागाचे प्रमुख अनिरुद्ध बनसोड ,इंग्रजी माध्यम चे उपप्राचार्य श्री. प्रशांत चव्हाण,श्रीशैल मोटगी, श्री. राजू पाचोरे, श्री. विनायक जोशी, पत्रकार ,सर्व सांगली जिल्ह्यातील सरपंच, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ललिता गौंडाजे, सौ सुनीता पाटील यांनी केले.शेवटी वंदे मातरम ने कार्यक्रमाचे सांगता झाली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: