राजु कापसे
रामटेक
ताई गोळवलकर महाविद्यालय रामटेक येथील स्पर्धा परीक्षा विभाग, रसायनशास्त्र विभाग आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी “IIT-JAM, NET, GATE आणि SET परीक्षांच्या तयारीसाठीची धोरणे आणि करिअरच्या संधी” या विषयावर दिनांक 05 ऑगस्ट 2023 रोजी व्याख्यान घेण्यात आले.
सदरील विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सोपान वाघलगावे ( रिसर्च असोसिएट, JNCASR, बंगलोर) आणि श्री ज्ञानेश्वर भुसनार ( संशोधक, CSIR-IICT, हैदराबाद) उपस्थित होते. सदरील कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे संचलन प्रा. उज्वला देवरणकर मॅडम यांनी केले आणि प्रास्ताविक महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. विजय राऊत यांनी मांडले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्पर्धा परीक्षा समन्वयक डॉ. राहुल हंगरगे सरांनी केला.
प्रमुख पाहुण्यांनी IIT-JAM ची तयारी, पात्रता निकष, परीक्षा पद्धती या विषयावर व्याख्यान दिले. तसेच रसायनशास्त्र या विषयातील NET, SET आणि GATE या परीक्षांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्री. ज्ञानेश्वर भुसणार सरांनी विद्यार्थ्यांना बी.एससी. आणि एम.एससी. नंतर संशोधन क्षेत्रातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील एकूण 126 विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु. शुभांगी अमृते यांनी मांडले.
सदरील कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.