Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayक्रिकेट सोडून धोनी शेतात करतोय ट्रॅक्टरनी नांगरटी...आनंद महेंद्रा यांनी केला शेयर व्हिडीओ...पाहा...

क्रिकेट सोडून धोनी शेतात करतोय ट्रॅक्टरनी नांगरटी…आनंद महेंद्रा यांनी केला शेयर व्हिडीओ…पाहा व्हायरल Video

भारतीय क्रिकेटला आपल्या खेळीने आणि नेतृत्वाने उच्च स्थानावर नेऊन ठेवणारा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सध्या आपलं आयुष्य आरामात घालवत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो शेतात ट्रॅक्टरवर बसून नांगरताना दिसत आहे. हा Video प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेयर केला असून या video ची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा आहे.

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने क्रिकेट जगतातून निवृत्ती घेतली मात्र सोशल मीडियावर नेहमीच आपल्या स्टाईलने लोकांना आश्चर्यचकित करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अलीकडेच त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. पण धोनीने हा व्हिडिओ दोन वेळा शेअर केला आहे.

यापूर्वी त्याने 8 जानेवारी 2021 रोजी व्हिडिओ शेअर केला होता. यासोबतच त्यांनी या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काहीतरी नवीन शिकणे चांगले आहे, पण काम पूर्ण व्हायला खूप वेळ लागला’ पूर्ण व्हिडिओ पहा…

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: