Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीएलसीबीने कारवाई करत इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास पिस्तुलासह केले जेरबंद-पन्नास हजार...

एलसीबीने कारवाई करत इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकास पिस्तुलासह केले जेरबंद-पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त…

सांगली – ज्योती मोरे

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे ताकारी ते इस्लामपूर रस्त्यावर सापळा रचून आकाश तानाजी गुरव.वय-28 वर्षे, राहणार- एसटी स्टँड जवळ, ताकारी, तालुका- वाळवा या युवकास ताब्यात घेतलेआहे. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला पाठीमागील बाजूस पॅन्ट मध्ये खोचलेले गावठी बनावटीचे एक पिस्तूल आणि खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

सदर पिस्तुलाच्या परवाना संदर्भात विचारले असता,त्याने तसा परवाना नसल्याचे सांगितले आहे.त्याच्याकडून सुमारे 50 हजारांच्या एका पिस्तुलासह चारशे रुपये किमतीची दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली असून, त्याच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम 1959 च्या आर्म ॲक्ट 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीसह मुद्देमाल इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. अधिक तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, बिरोबा नरळे,संदीप पाटील, सागर लवटे, अनिल कोळेकर, विक्रम खोत, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आणि निलेश कदम आदींनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: