पातूर : स्थानिक मुजावर पुरा येथे कत्तलीसाठी 5 गोवंश असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता मुजावर पुरा येथे धाड टाकून या ठिकाण वरून 5 गोवंश ताब्यात घेऊन एक आरोपी ताब्यात घेतल्याची घटना आज सकाळी 9 वाजता चे दरम्यान हि कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मुजावरपुरा येथील सै. रशीद सै. बशीर वय 65 याचे घरी कत्तली साठी एक गोरा व चार गाई असल्याचि गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता आज दिनांक 24 जून रोजी सकाळी 9 वाजता चे दरम्यान धाड टाकली असता त्याठिकाणी 1 गोरा व 4 गाई असे एकूण 5 गोवंश त्या ठिकाणी आठळून आले असता या गोवंशची किंमत अंदाजे 95 हजार रुपये असून गोवंश ताब्यात घेऊन आरोपी सै. रशीद सै. बशीर यास ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध फिर्यादी सर तर्फे मुकुंद खंडेराव देशमुख यांच्या तक्रारी वरून अप नंबर 296/23 कलम 5अ, 5ब, A, प्राण्याचा छळ प्रतिबंधक कलम 11,9,429 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सै. रशीद सै. बशीर यास ताब्यात घेण्यात आले आहे