सांगली प्रतिनिधी– ज्योती मोरे
आटपाडी आवळाई रोडवरील गुरुकुल शाळेजवळ बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार छापा टाकून विनापरवाना पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या परशुराम रमेश करवले वय वर्षे 23 राहणार कृष्णामाई घाटासमोर कराड, सध्या राहणार साठे नगर चौक आटपाडी व रविराज दत्तात्रय गोरवे वय 29, राहणार मनीषा नगर महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, परशुराम करवले याच्या कमरेला खोचण्यात आलेलं एक देशी बनावटीचे पिस्तूल व त्यांच्या खिशात असलेली तीन जिवंत काढतूसे मिळून आली.
या पिस्तुल्याबाबत विचारणा केली असता ते विनापरवाना पिस्तूल दत्तात्रय गोरवे याला विक्री करण्यासाठी आणल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार या दोघांसह पिस्तूल, तीन काढतूसे आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली महिंद्रा स्कार्पियो चार चाकी गाडी असा एकूण 7,50,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींसह मुद्देमाल आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येडेकर अमोल आयताळे सचिन कनप, सुनील जाधव, मच्छिंद्र बर्डे ,गौतम कांबळे अजय बेंद्रे,आर्यन देशिंगकर, संदीप पाटील,प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे, आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल उमर फकीर ,पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद रोडे आदींनी केली