सांगली – ज्योती मोरे
चोरीतील दागिने विक्रीसाठी जाणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना सुभाषनगर आप्पासाहेब हुळ्ळे प्लॉटच्या कमानी जवळून सापळा रचून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. अक्षय लक्ष्मण कांबळे वय वर्षे 27 राहणार हुळ्ळे प्लॉट, गल्ली नंबर 14, सुभाष नगर, तालुका मिरज आणि महंमद हुसेन उर्फ हनीसिंग उर्फ मच्छर महंमदगौस शेख राहणार रामनगर धारवाड जिल्हा बेळगाव, कर्नाटक या दोघांना ताब्यात घेतले आहे.
त्यांच्या अंगझडतीत अक्षय कांबळे यांच्याकडील प्लास्टिक पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले. सदर मालाबाबत विचारना केली असता, त्यांनी काही दिवसांपूर्वी विश्रामबाग, सांगली, कुपवाड,बामणी, कोरोची, हातकणंगले आदी ठिकाणी केलेल्या घरफोडीतील असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सांगली, एमआयडीसी कुपवाड, मिरज ग्रामीण, शहापूर आदी पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर हे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान त्यांच्याजवळ 1000 रुपयांचे पैंजण,3000 रुपये किमतीचा चांदीचा छल्ला, 1 लाख 40 हजारांचा सोन्याचा राणीहार, 10 हजार 500 रुपयांची अंगठी, 28 हजारांची कर्णफुले,1 लाख 5000 ची पिळ्याची सोन्याची चैन, 42 हजारांचा नेकलेस,1 लाख 5000 चे गंठण, 1000 चे चांदीचे पैंजण असा एकूण 5 लाख 37 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींसह मुद्देमाल विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
आरोपी मोहम्मद हुसेन उर्फ हनी सिंग उर्फ मच्छर मोहम्मद गौस शेख हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी विद्यानगर पोलीस ठाणे, धारवाड येथे पाच,सबरबन पोलीस ठाणे येथे दोन, हुबळी पोलीस ठाण्यात एक तर हवेली पोलीस ठाण्यात एक असे एकूण नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, दीपक गायकवाड,चेतन महाजन, सचिन धोत्रे, ऋतुराज होळकर नागेश खरात हेमंत ओमासे कुबेर खोत सुनील लोखंडे ,संदीप नलावडे, प्रशांत माळी, सुधीर गोरे, कॅप्टन गुंडवाडे, विकास भोसले, सुरेखा कुंभार आदींनी केली.