सांगली – ज्योती मोरे
तासगांव, इस्लामपूर विटा आणि संजय नगर,श्रीगोंदा, फलटण,इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी आणि दरोडा टाकणाऱ्या महेश किरास चव्हाण. वय वर्षे 21, जामदार मळा, कोकणगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर व रोहित उर्फ सोन्या दीपक काळे वय 19 वर्षे, राहणार शिंदा तालुका, कर्जत जिल्हा अहमदनगर.
या दोघा अट्टल दरोडेखोरांना आज स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं सापळा रचून सांगली साखर कारखाना परिसरातील अहिल्यानगर भागातून संशयितरित्या फिरत असताना, खास बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार अटक केली आहे.
त्यांची अंगझडती घेतल्यानंतर महेश चव्हाण यांच्या पॅन्टच्या खिशात चार ग्रॅम वजनाची अंगठी मिळून आली. याबाबत अधिक सखोल चौकशी केली असता, काही दिवसांपूर्वी विट्यात घरात घुसून धारदार हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याजवळ असणाऱ्या हिरो कंपनीच्या पॅशन गाडीची पाहणी केली असता सिटखाली ठेवलेली कटावणी आणि धारदार सुरा मिळून आला.
महेश चव्हाण यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सहा तर रोहित काळे यांच्या विरोधात फलटण व इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत.तर विटा, तासगाव इस्लामपूर व संजय नगर पोलीस ठाणे हद्दीतील चार गुन्हे उघडकीस आलेयत.विटातील चोरी केलेला मुद्देमाल साताऱ्यातील एकाकडे ठेवल्याचे सांगितले त्यानुसार साताऱ्यातून पंचनामा करून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून यामध्ये चालू बाजारभावाप्रमाणे सहा लाख रुपये किमतीचे 120 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
सदर गुन्ह्यातील आरोपींसह मुद्देमाल पुढील तपासकामी संजय नगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे .सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर,सागर टिंगरे, संदीप गुरव, बिरोबा नरळे ,सागर लवटे, अच्युत सूर्यवंशी,जितेंद्र जाधव, मच्छिंद्र बर्डे, निलेश कदम, संदीप पाटील, सुधीर गोरे,अनिल कोळेकर विक्रम खोत, उदयसिंह माळी, संतोष गळवे, कॅप्टन गुंडवाडे, प्रकाश पाटील, स्नेहल पाटील आदींनी केली आहे.