सांगली – ज्योती मोरे.
मिरज मधील मंगल टॉकीज जवळ छापा टाकून नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरजेतील मंगल टॉकीज जवळ सापळा रचून परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक आणि परिविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक मनीषा कदम यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई करत गौस हुसेन बागवान उर्फ गौस शेख.वय वर्षे- 25 राहणार.नदाफ गल्ली,मिरज, तालुका- मिरज,जिल्हा सांगली.यास खास बातमीदारांने दिलेल्या माहितीनुसार नशेच्या 80 गोळ्यांसह ताब्यात घेतलंय.
परिविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक संदेश नाईक यांनी सदर गोळ्यांचा साठा कोणत्या कारणासाठी बाळगला असल्याची आणि कोठून आणल्याची माहिती विचारल्यानंतर सदर गोळ्या शहानवाज शेख उर्फ जग्वार राहणार -कर्णाळ रोड, सांगली यांच्याकडून चढया दराने नशेसाठी विक्री करण्यासाठी आणल्याचं सांगितलं.
सदर मुद्देमाल जप्त करून आरोपी आणि मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. आरोपीवर एनडीपीएस ऍक्ट प्रमाणे कारवाई करण्यात आलीय. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके,
परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संदेश नाईक,परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक मनीषा कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे संजय कांबळे,राजू शिरोळकर, बिरोबा नरळे,मच्छिंद्र बर्डे, संकेत मगदूम, अजय बेंद्रे आदींनी केली.