सांगली – ज्योती मोरे.
घरफोडी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश शिवलिंग हदिमणी वय वर्षे 24,राहणार- इंदिरानगर ,झोपडपट्टी सांगली. यास खास बातमीदारांना दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धामणी रोडवरील शांतीबन चौकातून सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 4 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे 2 लाख 78 हजारचे दागिने, 14 हजार रुपये रोख, तर 125 ग्रॅम वजनाचे 7 हजार 500 रुपयांचे चांदीचे दागिने असा एकूण तीन लाखाचा मुद्देमाल मिळून आला असून मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर, दागिन्यांबाबत विचारणा केली असता, त्यांने विश्रामबाग आणि कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी घरफोडी करून ते दागिने चोरल्याचे कबूल केले. सदर, गुन्हेगारांसह मुद्देमाल विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे,
पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरोबा नरळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप गुरव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम, पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल नागेश कांबळे,सुनील जाधव,
पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंद्रे, रोहन घस्ते,विनायक सुतार,पोलिस कॉन्स्टेबल अभिजीत ठाणेकर,पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे, कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाण्याचे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शुभांगी मुळीक, महिला हेड कॉन्स्टेबल सुनिता शेजाळे आदींनी केली.