Sunday, December 22, 2024
HomeMobileलावाने जबरदस्त 5G अनुभव आणि 18W फास्ट चार्जिंग सह 'Lava Yuva 5G' केला...

लावाने जबरदस्त 5G अनुभव आणि 18W फास्ट चार्जिंग सह ‘Lava Yuva 5G’ केला लॉन्च…

न्युज डेस्क – आघाडीच्या भारतीय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या लावा इंटरनॅशनल लिमिटेडने अफाट वेग आणि कामगिरी देऊ करण्यासाठी  पॉवर पॅक युवा ५जी (Lava Yuva 5G) बाजारात उतरवत असल्याचे जाहीर केले. दोन मेमरी प्रकार असणारा  युवा ५जी हा  वाढीव बॅटरी बॅकअप, अफाट वेग आणि दर्जेदार कॅमेरा वैशिष्ट्यांसह संपूर्ण  दिवसभर तुमच्या सोबत असणार आहे. भारतीय मूल्यात रु.  ९४९९ (६४ जीबी) आणि भारतीय मूल्यात रु. ९९९९ (१२८ जीबी) किंमत असणारा लावा ५जी हा ५ जून २०२४ पासून अॅमेझॉन, लावा ई-स्टोअर आणि लावा रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

आजच्या तरूण पिढीसाठी डिझाईन करण्यात आलेला युवा ५जी मॅट फिनिशसह प्रीमिअम स्लीक लुक आणि २ अतिशय आकर्षक अशा मिस्टिक ब्ल्यू आणि मिस्टिक ग्रीन रंगात श्रीमंती थाटात उपलब्ध आहे.  हा ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन उत्कृष्ट ग्लास बॅंक डिझाईन, साईड फिंगरप्रिंट सेन्सर, ४जीबी+४जीबी (आभासी) रॅम आणि पिक्चर्स, व्हिडीओज तसेच मोठ्या फाईल्ससाठी उच्च क्षमतेच्या ६४/१२८ युएफएस २. २ रोमसह उपलब्ध आहे. 

५०एमपी एआय ड्युअल रिअर  कॅमेरा आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा निसर्गाच्या आणि स्वत:च्या उत्कृष्ट फोटोंची हमी घेतो. फोनच्या खालच्या भागात असणारे फायरिंग स्पीकर आणि सी टाईप युएसबी केबल असणारा १८ वॅ. फास्ट चार्जिंग ही याची विशेष वैशिष्ट्ये आहेत. 

कोणत्याही जाहिराती नसलेला, ब्लोटवेअर नसलेला आणि फेस अनलॉक सुविधा असणारा क्लीन अॅन्ड्रॉईड १३, हे ग्राहकांना वाढीव अनुभव देण्यासाठी वचनबद्द असलेल्या लावा युवा ५जीचे वैशिष्ट्य आहे. २ वर्षांची सुरक्षितता अपडेटची हमी आणि अॅन्ड्रॉईड १४ वर अपग्रेड करण्याची सुविधा यात आहे.  या खेरीज, लावाकडून हँडसेटवर १ वर्षांची आणि अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरन्टीही देण्यात आली आहे.

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे मार्केटिंग हेड- श्री. पुरवंश मैत्रेय म्हणाले, “लावा ग्राहकांचा प्रवास हा आमच्या व्यवसाय नैतिकतेचा एक अविभाज्य भाग आहे. नव्या कल्पना, किंमत, दर्जेदार उत्पादने आणि सेवेच्या माध्यमातून आमच्या ग्राहकांना काहीतरी चांगले देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. तरुणांची स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धती आणि प्राधान्य लक्षात घेऊन युवा ५जी ची रचना करण्यात आली आहे.  यातील पॉवर पॅक वैशिष्ट्ये संपूर्ण सुरक्षा आणि खात्रीशीर अपडेटचा अखंड अनुभव देतात.”     

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे प्रॉडक्ट हेड श्री. सुमित सिंग म्हणाले, “नव्या कल्पना आणि उत्कृष्टता हे आमचे उत्पादन प्रवासातील कळीचे मुद्दे आहेत.  परवडणाऱ्या किंमतीमध्ये गतिमान कामगिरी आणि नव्या काळातील स्मार्टफोन वैशिष्ट्ये देऊन आमच्या ग्राहकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने युवा ५जी ची रचना करण्यात आली आहे. 

ऑक्टा-कोर प्रोसेसर, ड्युअल एआय कॅमेरा आणि जलद चार्जिंग अशा वैशिष्ट्यांनी युक्त असणारा युवा ५जी या विभागात नवीन मापदंड प्रस्थापित करून आपल्या वापरकर्त्यांसाठी सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आणि सृजनशीलता घेऊन येत आहे.”

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: