रामटेक – राजु कापसे
राज्य शाशनातर्फै नियोजीत कार्यक्रमानुसार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख यांच्या अरोली येथुन काँग्रेस गटातुन श्वेता ओमराज आकरे आणि ज्योती नंदकिशोर मेहर यांनी अर्ज दाखल केले.
सरपंच पदाकरीता दिग्गज उमेदवार मैदानात उतरल्याने निवडणुकीत वेगळीच रंगत आली आहे.उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मौदा तहशील कार्यालयात राजकीय पक्षाचे पदाधिकारी दिसून आले..शिवसेना गटाकडुन रोशनी प्रशांत भुरे तसेच.सदानंद निमकर बिजेपी गटाकडुन माधुरी शिवचरण निमकर यांनी अर्ज दाखल केल्याने एकच चुरस वाढल्याचे दिसुन येत आहे.
राज्य निवडणुक आयोगाकडुन ऑफलाइन अर्ज स्विकारण्याचे आदेश येताच सकाळपासून मौदा तहसील कार्यालयामध्ये उमेदवारासह त्यांचे समर्थक यांची गर्दी पहावयास मिळाली.
तालूक्यात एकुन २५ ग्रामपंचायती करीता थेट सरपंच पदासाठी निवडणुक होत असुन अरोली ग्रामपंचायत मध्ये १३सदस्य असणाऱ्या ग्रामपंचायती मध्ये काँग्रेस गट विरूद्ध शिवसेना गट दुहेरी लढत असल्याचे दिसत होते.
परंतु बिजेपी गटाकडुन शेवटच्या दिवशी माधुरी शिवचरण निमकरण यांनी सरपंच पदाकरीता अर्ज दाखल केल्याने लढती मध्ये वेगळीच चुरस निर्माण झाली आहे.. सर्वाच्या नजरा आता अरोली ग्रामपंचायतीकडे..लागल्या आहेत…