Friday, November 22, 2024
Homeराज्यपातूर तलावाच्या मातीच्या संरक्षण भिंतीवर मोठी झाडे...

पातूर तलावाच्या मातीच्या संरक्षण भिंतीवर मोठी झाडे…

पातूर – निशांत गवई

पातूर बोर्डी नदीवर घाटामध्ये असलेल्या पातुर तलाव 100% भरला आहे परंतु या तलावाच्या मातीच्या संरक्षण भिंत असलेल्या भिंतीवर मोठी मोठी झाडे वाढल्याने ही झाडे भविष्यात या धरणाकरिता धोक्याची घंटा मानली जात असून या झाडांची तात्काळ साफसफाई करण्याची मागणी पातुरवाशीयांकडून होत आहे.

पातुर तलाव हा शहराच्या वरती असलेल्या घाटामध्ये बोर्डिंग नदीवर बांधण्यात आलेला आहे दरवर्षी या तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा साठवून केल्या जात असतो व या बांधावर अनेक शेतकरी शेती सुद्धा करतात परंतु तलावाच्या मातीच्या संरक्षण भिंतीवर मोठी मोठी झाडे उगवली असल्याने भविष्यात ही झाडे या भिंतीला कमकुवत करून धोका निर्माण करू शकतात त्यामुळे या झाडांची तात्काळ साफसफाई करण्याची मागणी नागरिक काढून होत आहे.

1994 मध्ये बोर्डी नदीला मोठा करून शहराला पुराचा वेड्याने अनेक घरांचे तथा दुकानांची नुकसान झाले होते या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता या मातीच्या भिंतीवर असलेले झाडांची तात्काळ साफसफाई होणे गरजेचे असून यामुळे भविष्यात नदीला मोठा पूर येऊन शहराला धोका निर्माण होऊ शकतो असे असे अनेक जाणकारांचे मत असून पातूर तलावाच्या साफसफाई व दुरुस्तीकरिता मोठा खर्च होत असताना या झाडांची साफसफाई का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केला जात असून तात्काळ या झाडांची साफसफाई करून मागणी शहरातील सुजाण नागरिक करीत आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: