शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे यांच्या पिंप्री गवळी येथील मंडळात १५ वर्षापासून आज पर्यंत एकही वर्षी वाजला नाही डी.जे दरवर्षी जय बजरंग जगदंबा उत्सव मंडळ मोठी देवीची भव्यदिवस शोभायात्रा टाळ मृदंगाच्या गजरात निघते पिंप्री गवळी चा आदर्श इतर मंडळांनी सुद्धा घ्यावा.
खामगाव – हेमंत जाधव
संपूर्ण भारतात फक्त खामगाव येथे कोजागिरी पौर्णिमेला मोठी देवी शांती उत्सव साजरा होतो आणि दहा दिवस चालतो, भाविक मोठ्या भक्तिभावाने दुरून दुरून दर्शनाला येतात, देवी नवसाला पावते म्हणून भाविक नवस मागतात, आता खामगाव शहरासह तालुक्यातही मोठी देवी उत्सव भक्तिभावाने साजरा करतात, तालुक्यातील पिंप्री गवळी मध्ये अखंड पंधरा वर्षापासून एकही वर्ष डीजे किंवा बँड न लावता टाळ मृदंगाच्या गजरात एक गाव एक देवी विसर्जन मिरवणूक भव्य दिव्य स्वरूपात पूर्ण गावात रंग रांगोळ्या काढून जागोजागी स्वागत व चहापाणी देऊन निघते.
त्यामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येत उपस्थितीत राहून मिरवणुकीची शोभा वाढवतात व रात्री बारा ते एक वाजेपर्यंत शंभर टक्के सहभाग देतात. त्या उलट जिथे डीजे किंवा बँड लागतो तिथे कुठलीहीं महिला येते नाही आणि कुठे महिला डीजे पाण्यासाठी इच्छुक नसतात. आणि आपण आपल्या देवी देवतांपुढे देवी देवतांचे गाणे सोडून इतर कुठल्याही प्रकारचे गाणे वाजवतो हे किती पत योग्य आहे.
आपल्याला उत्सव दारू पिऊन नाचण्याकरता दिले नसून संघटित होऊन हिंदू धर्म जागृती करण्याकरिता दिले आहेत.
हिंदू सोडून इतर धर्मियांमध्ये त्यांच्या धार्मिक कार्यक्रमात असा धांगडधिका कधीच नसतो. आपल्या लग्नकार्यात वाढदिवस साजरा करणे पार्टी साजरी करणे यामध्ये डीजे किंवा बँड वाजून फिल्मी गाणे वाजवायला चालतात परंतु धार्मिक कार्यक्रमांमध्ये फिल्मी आणि धांगडधिंगा गाणे वाजून आपण आपल्याच देवी देवतांचा महापुरुषांचा कशाप्रकारे उत्सव साजरा करतो हे या घडीतील युवकांना समजण्याची गोष्ट आहे.
दरवर्षी मंडळात चळवळ असते आपण सर्वात मोठा गाजलेला डिझेल आणायचा बारामती असो,चाळीसगाव असो लाख लाख रुपये देऊन डीजे वाजवतात त्यामध्ये डीजेच्या अति आवाजामुळे वृद्धविकाराचा झटका येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये कित्येक युवकाचे जीव सुद्धा गेले आहेत आणि त्या लेझर लाईट मुळे बऱ्याच युवकांच्या डोळ्याला सुद्धा प्रॉब्लेम आलेला आहे.
तरीसुद्धा जीवनाला हानिकारक असलेला डीजे युवकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. परंतु पिंप्री गवळी गावामध्ये मोठी देवी उत्सव,श्री महादेव व मारुती देवस्थान वर्धापन दिन,भागवत सप्ताह,असे वर्षातून तीन उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात उत्सवात मद्ये स्पर्धा राहते ती उत्कृष्ट मृदंगाचार्य,उत्कृष्ट गायनाचार्य,उत्कृष्ट टाळकरी आणण्याची.
आणि चांगले चांगले कलाकार शोधून दरवर्षी मोठी देवी उत्सवासह तीन उत्सव मोठ्या हर्ष उल्हासने साजरे करतात.
यामध्ये यावर्षी गायनाचार्य म्हणून विदर्भगाण कोकिळा ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज गाडेकर,व गायन सम्राट अरुण महाराज बोदडे, नामवंत मृदंगाचार्य म्हणून ह.भ.प.महेश महाराज ढोरे, टाळकरी म्हणून शिवमुद्रा टाळकरी गव्हाण व पिंप्री गवळीचे युवक होते.
व दरवर्षी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेणारी मंडळी पुढील प्रमाणे. राजेंद्र बघे,ह.भ.प.जनार्दन महाराज चांदुरकर,गजानन बघे,राजू बेलोकार,दिगंबर उमाळे, किसना महाराज बंड,रामेश्वर सपकाळ, श्रीकृष्ण चोपडे, विष्णू सुडोकार,गोपाल इंगळे,लक्ष्मण काकडे,उमेश गोळे,कृष्णा पुराणे,गणेश वाघमारे,राजू पुराने,प्रभुदास पुराने,संतोष खेडकर सर,अमोल चेंदेल,सचिन अवथडे,संजय सोडोकार,गणेश खेडकर, धनेश अवथडे,सुधाकर गोळे, भानदास राठोड,
शालिग्राम लाहुडकार,डॉ ज्ञानेश्वर लाहुडकार, विनोद होगे, दीपक होगे,गोपाल जगताप,हरिदास अवथडे, विष्णू काळे,मुरलीधर बहादरे, अरुण बंड,राजू बंड,गोपाल बहादरे,विनायक केने, ज्ञानेश्वर काळे,अनिल काळे, पुरुषोत्तम वायचाळ,अजय काळे,विक्की बहादरे,श्रीकृष्ण अहिर, देविदास श्यामसुंदर,श्रीकृष्ण सुरेकार,राजू वडोदे,
अशोक धनोकार,महादेव काकडे, राजू काकडे,शुभम डोंवगे, भास्कर गासे,शेख समीर,नरेंद्र भगत,दिगंबर वाघ,अनिल उमाळे,प्रदीप सपकाळ,योगेश राठोड, सुभाष काळे, किशोर काळे, शिवाजी बोदडे,गोपाळ गोळे,शिवा राठोड,महेश शिंदे,गोकुळ राठोड,गजानन अंजनकर, किशोर घुगे,रवी पाटील,शिवा गोळे,पुरुषोत्तम पायघण, गजानन सुलताने,
विठ्ठल हरमकार,निलेश तवर,गोपाल हरमकार, संजय गंगाराम सुडोकार,रामदास सुडोकार,नारायण गावंडे,सचिन राऊत,दत्ता गायकवाड,शेख शरीफ, विशाल ठाकरे,गोलू मोरे, अनिल बर्डे,पवन मोरे, आदींचा सक्रिय सहभाग असतो.