Saturday, November 23, 2024
Homeव्यापारदेवलापार ईथे लांजिगड अग्रो प्रोड्युसर कंपनी लिमि. कार्यालय उद्धाटन तथा शेतकरी मेळाव्याचे...

देवलापार ईथे लांजिगड अग्रो प्रोड्युसर कंपनी लिमि. कार्यालय उद्धाटन तथा शेतकरी मेळाव्याचे आयोजन…

रामटेक – राजु कापसे

रामटेक :- दिनांक २७/११/२८२३ रोजी लांजिगढ अग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड तर्फे कार्यालयाचे उद्घाटन देवलापार, रामटेक येथे करण्यात आले व शेतकरी मेळाव्याचे आयोजन अपलोना गोंडवाना गोटूल सभागृह पवनी येथे संपन्न झाले.

मेळाव्याचे व कार्यालयाचे उद्घाटक म्हणून मा. रवींद्र ठाकरे भा.प्र.से.अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर व मा. राजे वासुदेव शहा टेकाम अध्यक्ष श्रमिक कामगार संघटना नवी दिल्ली तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी हे उपस्थित होते. कार्यालयाचे उद्घाटन सन्माननीय रविंद्रजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता पार पडले.

कंपनीला सन्माननीय ठाकरे साहेबांनी पुढील कार्यसाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या. सोबतच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कंपनीने काम करावे असे आवाहन केले. व आदिवासी विभागाकडून कंपनीला जास्तीत जास्त सहकार्य कसे करता येईल याची हमी दिली व मार्गदर्शन केले.

सकाळी ११.०० वाजता शेतकरी मेळावा अपलोना गोंडवाना गो टूल सभागृह पवनी येथे मा. राजे वासुदेव शहा टेकाम यांच्या हस्ते व माननीय सुमित्रा ताई टेकाम यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. व कार्यक्रमची सुरवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. शिवप्रसादजी कुमरे होते, मुख्य मार्गदर्शक म्हणून अरुण पवार कोषाध्यक्ष TICCI महाराष्ट्र चॅप्टर, श्रीमती शांताताई कुमरे सदस्य जिल्हा परिषद नागपूर,

श्रीमती मंगलाताई निंबोणे सभापती पंचायत समिती पारशीवनी तथा कंपनीच्या सदस्या, मा. हरिभाऊ उईके सदस्य जिल्हा परिषद नागपूर , मा डॉ.नरेंद्रजी कोडवते सचिव गोंडवाना विकास मंडळ नागपूर , मा.श्री चंदनसिंग उईके सचिव अपलोना गोंडवाना गोटूल पवनी, मा. डॉ. पुरुषोत्तम मडावी अध्यक्ष गोंडवाना विकास मंडळ नागपूर तथा प्रिन्सिपल सार्वजनिक आरोग्य विभाग नागपूर,मा.डाॅ .दिलीप कुमरे साहेब नेत्र विभाग प्रमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर,

मा श्री अशोक जी मसराम सीनियर ब्रांच मॅनेजर इंडियन बँक मनीष नगर नागपूर, मा. श्री राधेश्यामजी उईके वरिष्ठ व्यवस्थापक औष्णिक विद्युत केंद्र कोराडी , मा. श्री ताराचंदजी सलामे माजी सरपंच ग्रामपंचायत वडांबा, मा. कंचनलता मरसकोल्हे सीआरपी पंचायत समिती रामटेक सावित्रीबाई स्वयंसहाय्यता महिला समूह जुनेवाणी, मा.श्री उमेशजी भांडारकर ,मा. महेश जी बमनोटे माजी जिल्हापरीषद सभापती जिल्हा परिषद नागपूर, मा. श्री संदीप भलावी सदस्य पंचायत समिती पारशीवनी , मा. श्री प्रवीण जी उईके नवनिर्वाचित युवक सरपंच ग्रामपंचायत पिपरिया,

मा. सौ कल्पनाताई भलावी नवनिर्वाचित सरपंच ग्रामपंचायत बांद्रा, मा. श्री दिनेश जी उईके कृषी अधिकारी पंचायत समीती रामटेक, मा.मुकेश दुबे सरपंच ग्रामपंचायत वडांबा प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने श्री रोशन मारुतीची मसराम,श्री मधुकर परसराम जी वरखडे करवाही, श्री नामदेव मरसकोल्हे उमरी, श्री सुधाकर कुमरे बोथिया पालोरा, श्री राधेश्यामजी उईके पथरई ,

मोरेश्वरजी वरखडे पथरई यांच्या समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.श्री नंदकिशोर उईके व्यवस्थापकीय संचालक यांनी केले. यात त्यांनी कंपनीचे ध्येय व उद्दिष्टे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन राजे टेकाम साहेबांनी रामटेक व पारशीवनी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक प्रकारची शेती करून आपल्या संपूर्ण विकास करावा.या संदर्भात मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय मार्गदर्शन मा श्री शिवप्रसाद जी कुमरे यांनी केले त्यांनी कंपनीची या भागातील शेतकऱ्यांना कशी मदत होईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकरी मेळाव्या करिता आलेल्या सर्व पाहुण्यांचे श्री मधुकरजी वरखडे संचालक तथा कोषाध्यक्ष यांनी लांजिगड ऍग्रो प्रोड्युसर कंपनी तर्फे सर्वांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन श्री घनश्याम सर्याम संचालक तथा सचिव यांनी केले व कार्यक्रमाच्या तसेच यशस्वीतेसाठी कंपनीच्या सर्व संचालक मंडळांनी सहकार्य केले. सर्वांचे मनापासून आभार मानले.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: