Monday, December 23, 2024
Homeदेशलालू यादव यांची मुलगी रोहिणी लालू यांना किडनी दान करणार…सोशल मिडीयावर होत...

लालू यादव यांची मुलगी रोहिणी लालू यांना किडनी दान करणार…सोशल मिडीयावर होत आहे कौतुकांचा वर्षाव…

बिहारच्या राजकारणातील मोठ नाव राजद सुप्रीमो आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव गेल्या अनेक वर्षांपासून किडनीसह अनेक आजारांनी त्रस्त आहेत. सिंगापूरमध्ये राहणारी त्यांची मुलगी रोहिणी आचार्य त्यांची किडनी दान करणार आहे. गेल्या महिन्यात सिंगापूरला गेलेल्या लालू यादव यांना डॉक्टरांनी किडनी ट्रान्सप्लांट करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर रोहिणीने वडिलांना किडनी दान करण्याची सांगिले होते. तर रोहणीच्या या निर्णयाचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.

आरजेडी प्रमुख लालू यादव सुरुवातीला रोहिणीची किडनी दान करण्याच्या बाजूने नव्हते, पण नंतर रोहिणी आणि इतर कुटुंबीयांच्या दबावानंतर लालू यादव यांनी होकार दिल्याचेही कळते. लालू यादव 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान पुन्हा सिंगापूरला जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

लालूंची दुसरी मुलगी रोहिणी सिंगापूरमध्ये राहते. वडिलांच्या किडनीच्या आजारामुळे तो खूप चिंतेत आहे. लालू प्रसाद यादव 12 ऑक्टोबरला किडनी प्रत्यारोपणासाठी सिंगापूरला गेले होते. लालू प्रसाद यांच्यासोबत त्यांची पत्नी राबडी देवी आणि त्यांची मोठी मुलगी मिसा भारती हेही सिंगापूरला गेले होते. राजद प्रमुख सिंगापूरला पोहोचल्यानंतर दोन दिवसांनी लालूंची डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. लालू यादव यांना सिंगापूरमधील डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी रोहिणी यांचा मोठा वाटा होता.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: