पातूर – निशांत गवई
पातूर येथील शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई देशपांडे वरिष्ठ मराठी प्राथमिक शाळा पातुर येथे नुकतेच विद्यार्थ्यांमध्ये शाळा व अभ्यासा विषयी रूची निर्माण व्हावी म्हणून” शाळा पूर्व तयारी मेळावा ” घेण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.व्हि.एम.सरप मॅडम तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनीधी श्री.काळापांडे भाऊ , सौ.मनिषाताई इंगळे , सौ.चव्हाण ताई ,सौ. बगाडे ताई , सौ.कावस्कार ताई ,इत्यादी पालक कार्यक्रमाला उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षा तसेच प्रमुख पाहुणे यांचे हस्ते विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वतीच्या प्रतीमेचे पुजन व दिप प्रज्वलन करुन या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. सत्र २०२३-२४ या शैक्षणिक वर्षीसाठी शाळेमध्ये वर्ग १ ली मध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांना शाळा पूर्व तयारी विषयी विद्यार्थ्यांना कशाप्रकारे अभ्यासाची आवड निर्माण होईल या विषयी सविस्तर मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका कु.व्हि.एम सरप मॅडम तसेच श्री सानप सर , यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला इयत्ता १ ली मध्ये दाखाल होणारे बहुसंख्य विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते .तसेच शिक्षक वृंद देशमुख मॅडम, लखाडे मॅडम,डाखोरे सर , सिरसाट सर,राठोड सर , घोरे सर , कॉन्व्हेंट टिचर शुभांगी राखोंडे , शितल गुजर यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका कु.व्हि.एम.सरप मॅडम यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.कार्यक्रमाचे संचालन सानप सर यांनी केले .तर आभार डाखोरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.