शहापूर चे आमदार दौलत दरोडा यांची राज्यातील महिला बचत गटाच्या सेविकांसाठी पेन्शन आणि ग्रॅज्युटी ची मागणी…
शहापूर – प्रफुल्ल शेवाळे
महिला व बालविकास विभाग,महाराष्ट्र शासन,कायापालट केंद्र किनवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहापूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने महिला संवाद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. अदिती तटकरे उपस्थित होत्या. यावेळी ठाणे जिल्ह्यातील समस्त बचत गट महिला विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) चा तमाम महिला वर्ग उपस्थित होता.सदर मेळाव्या मध्ये शहापूर तालुक्यातील रान भाज्यांचे प्रदर्शन मांडले गेले होते.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री ना. अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील तमाम महिला वर्गाला महायुती सरकारची भेट आहे आणि ही योजना केवळ एक दोन महिन्यासाठी नाही तर अखंड पणे चालूच राहणार आहे असं म्हटलं आहे. तर महिलांना ऑगस्ट नंतर सुद्धा नाव नोंदणी करता येणार आहे आणि या योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्ट रोजी देण्यात येणार आहे.
बचत गट आणि महिला विकास महामंडळ यांच्या मार्फत अनेक महिलांना रोजगार मिळत आहे, कामे मिळत आहेत. भविष्यात सदर पसारा अजून व्यापक स्वरूपामध्ये असणार आहे,असं मंत्री तटकरे यांनी म्हटलं आहे.तत्पूर्वी शहापूर चे आमदार दौलत दरोडा यांनी समस्त बचत गट महिला, आशा सेविकां, माविम च्या महिला वर्गाला पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळावी अशी मागणी मंत्री महोदयांना केली. यावर सदर प्रस्ताव शासन दरबारी मांडून महिलांना पेन्शन आणि ग्रॅज्युटी मिळवून देण्याचे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.
या कार्यक्रम मध्ये शहापूर चे आमदार दौलत दरोडा यांनी गेल्या ५ वर्षात आपल्या मतदार संघात पूर्ण केलेल्या कामांची चित्रफीत प्रदर्शित केली. सदर मेळाव्या मध्ये राष्ट्रवादी चे प्रवक्ते आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत ( भाऊ ) गोंधळे,शहापूर तालुका आमदार दौलत दरोडा,प्रदेश चिटणीस डी. के. विशे सर, शहापूर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे, महिला जिल्हध्यक्ष ठाणे ग्रामीण सौ. कल्पना तारमळे, युवक जिल्हा अध्यक्ष ठाणे चे प्रतीक हिंदुराव,शहापूर तालुका युवक अध्यक्ष दिनेश चंदे, तालुका महिला अध्यक्ष सौ. मोरगे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, पालघर जिल्हा महिला व बालकल्याण सभापती सौ. रोहिणी शेलार, शहापूर तालुक्यातील विविध सेल चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा प्रवक्ते मुकेश दामोदरे सर यांनी केले.