पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असताना अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झटापट झाली आहे. या चकमकीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ९ डिसेंबरची आहे. चकमक झाल्यानंतर दोन्ही देशांचे सैनिक माघारले आहेत.
सूत्रांनी सांगितले की, 9 डिसेंबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमधील याग्त्से येथे भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या हिंसक झटापटीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. मात्र एकही भारतीय जवान गंभीर जखमी झालेला नाही.
सूत्रांचे म्हणणे आहे की, 9 डिसेंबर रोजी जेव्हा चिनी सैन्य यगतसे भागात आले तेव्हा ही चकमक झाली. त्याच्या या कारवाईवर भारतीय जवानांनी प्रत्युत्तर देत त्याचा पाठलाग केला. यादरम्यान दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. सूत्रांनी सांगितले की, या घटनेनंतर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मीटिंग झाली आणि हे प्रकरण मिटवण्यात आले.