सांगली – ज्योती मोरे.
खास बातमीदारामार्फत झालेल्या माहितीनुसार, आज चोरी केलेले सोन्याचे दागिने सोलापूरला जाऊन विक्री करण्यासाठी जत उमदी रोडवर सिध्दार्थ पब्लिक स्कूल जवळ थांबलेल्या किशन उर्फ कल्लाप्पा उर्फ फांगऱ्या रतन चव्हाण,वय 24 ,राहणार उमराणी रोड, पारधी तांडा जत, आणि सुरेश तुळशीराम चव्हाण वय 29 राहणार पारधी तांडा कुंभारी तालुका जत, या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून ताब्यात घेतलंय.
त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ 8 लाख 20 हजारांचे सोन्याचे तर 45 हजारांचे चांदीचे दागिने आणि पूजेचे साहित्य तसेच मूर्ती मिळून आल्यायत. या दोघांनी आपल्या एका साथीदारासह जत उमदी कवठेमंकाळ आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घरांची कुलपे तोडून चोरी केल्याचं कबूल केलंय. त्यांच्याकडून सदर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, मुद्देमाला सह आरोपींना उमदी पोलीस ठाण्याकडे पुढील तपास कामी वर्ग करण्यात आलंय.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल ,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर, अच्युत सूर्यवंशी, राजू शिरोळकर ,अमोल ऐदाळे, जितेंद्र जाधव, संजय पाटील, संदीप पाटील, संकेत मगदूम, मच्छिंद्र बर्डे, राहुल जाधव ,गौतम कांबळे, अजय बेंद्रे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, सागर लवटे, विक्रम खोत ,अनिल कोळेकर, संतोष गळवे ,सचिन कनप, सागर टिंगरे, शुभांगी मुळीक, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडवाडे आदींनी केली आहे.