Monday, December 23, 2024
Homeराज्यभक्तिमय वातावरणात कृष्णमाई उत्सव साजरा...

भक्तिमय वातावरणात कृष्णमाई उत्सव साजरा…

सांगली – ज्योती मोरे

भक्तिमय, आनंदी वातावरणामध्ये आणि उत्साहात मिरज कृष्णा घाट येथे सुरू असलेला दोन दिवसाचा कृष्णामाई उत्सव आणि महाआरती,सोहळा संपन्न झाला. शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी मिरज येथील गणेश मंदिर येथून अभिनेते शरद पोंक्षे यांच्या हस्ते पालखीने सोहळ्याची सुरुवात झाली होती. शनिवार ४ फेब्रुवारी आणि रविवार 5 फेब्रुवारी असा दोन दिवसाचा उत्सव काल रात्री गंगा आरती आणि मंत्रपुष्प विधीने समारोप झाला.

हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. रविवारी सकाळी कृष्णामाईची पंचोपचार आणि पंचामृत पूजा संपन्न झाली. यावेळी सुप्रसिद्ध शिखरे सदा पिढीचे संचालक श्री ओंकार शिखरे आणि सौ स्वरदा शिखरे यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले.

दुपारी ब्राह्मणपुरी मिरज येथील श्री मंगलमूर्ती भजनी मंडळाच्या महिलांनी भजन सादर केले. सायंकाळी पाच वाजता मिरज येथील पर्यावरण प्रेमी नागरिक श्री सुधीर गोरे यांचे प्लास्टिकच्या पिशव्या न वापरता कापडी पिशव्याचा वापर करा आणि निसर्गावर प्रेम करा असा संदेश देणारे माहिती पूर्वक व्याख्यान संपन्न झाले. सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर येथील सौ अमिषा करंबेळकर व त्यांच्या शिष्या आणि पुणे येथील सौ मयुरी विभुते v त्यांच्या शिष्या यांचे नृत्य सेवा झाली.

सायंकाळी कृष्णामाईची मिरजेचे सरकार हि हा श्रीमंत गोपाळजे पटवर्धन राणी सरकार सौ पद्माराजे पटवर्धन यांच्या हस्ते पंचोपचार पूजा संपन्न झाली. त्यानंतर गंगा महाआरती प्रारंभ झाली. हि हा श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन हि हा सौ पद्माराजे पटवर्धन माजी महापौर सौ संगीता खोत, विठ्ठल खोत, सौ जयश्री कुरणे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यानंतर मिरजेतील पुरोहित श्री काशिनाथ जोशी, श्री अनिकेत अर्जुनवाडकर, श्री अरविंद रूपलग, श्री संजय ताम्हणकर, अनिल देशपांडे, भालचंद्र शुक्ल यांनी मंत्रपुष्प सादर केले. कृष्णावेणी उत्सव समितीचे निमंत्रक श्री ओंकार शुक्ल यांनी सर्वांचे श्रीफळ प्रसाद देऊन स्वागत आणि आभार मानले. सौ अनुजा कुलकर्णी यांनी सूत्र संचालन केले.

श्री दिगंबर कुलकर्णी निलेश साठे, अनिल हंबर, बर डी के नाताने नाथांनी भालचंद्र शुक्ल, सुनील मोरे, नागेश पाटील अरविंद रुपलग, एडवोकेट प्रसाद देशपांडे, आकाश सोनीकर, श्रीकांत देशपांडे, अक्षय सोनीकर, ज्योती शुक्ल, रूपाली देसाई अनघा कुलकर्णी, सुप्रिया जोशी, माधुरी कापसे, मनीषा देशपांडे, चैत्राली शुक्ल, नम्रता साठे, शोभा यादव, सुरज डवरी, गौरी देवल, श्लोक पुरोहित,पोपत गोरे, यांनी संयोजन केले.

गेले चार वर्षे हा सोहळा सुरू असल्यामुळे कृष्णा घाटाचे मार्कंडेश्वर मंदिराचे महत्त्व वाढण्यास सुरुवात झालेली आहे तेथे होत असलेल्या सांस्कृतिक पर्यावरण पूर्वक कार्यक्रमातून लोकांचे प्रबोधन होते पण दीपप्रज्वलन रोषणाई यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे या सोहळ्याकडे लक्ष लागून राहिलेले असते. या उत्साहामुळे कृष्णा नदी आणि कृष्णा घाटकडे तसेच पुरातन मार्कण्डेय मंदिराकडे लोकांची येण्याची संख्या वाढत आहे. त्यामुळे या परिसराची धार्मिक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र विकसित व्हावे अशी मागणी समितीचे निमंत्रक ओमकार शुक्ल यांनी प्रशासनाकडे आवाहनाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: