रामानुजन यांचे जीवनचरित्र प्रत्येकांने वाचा – अतुल देशमुख
श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम
स्था. प्र.:- श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था तळवेल द्वारा संचालित मातोश्री कृष्णाबाई देशमुख विद्यालय प्रभू काॅलनी अमरावती येथे दि.22 डिसेंबर 2023 ला महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती निमित्त विविध उपक्रम घेऊन व मानवंदना देऊन साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल देशमुख तर प्रमुख पाहुणे ज्योती झाडे, सारिका वानखडे व मयुरा कांडलकर या होत्या. अध्यक्षीय भाषणामध्ये श्रीनिवास रामानुजन महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन अय्यंगार त्यापैकी एक होते. जगातील सर्वोत्तम गणिती विचारवंतांमध्ये त्यांचा समावेश होतो. रामानुजन यांच्याकडे एक अशी देणगी होती ज्याचा केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाला हेवा वाटला.
जेव्हा त्यांनी गणिताच्या जगात असंख्य महत्त्वपूर्ण योगदान दिले तेव्हा ते केवळ ३३ वर्षांचे होते. परिणामी एक उत्कृष्ट गणितज्ञ म्हणून त्यांनी जगभरात ख्याती मिळवली म्हणून या प्रसंगी आपणास एकच विनंती करतो की श्रीनिवास रामानुजन यांचे चरित्र प्रत्येकाने एकदातरी वाचावे असे उद्गार यावेळी शिक्षक अतुल देशमुख यांनी काढले.
नंतर विद्यालयामध्ये प्रश्न मंजुषा, रांगोळी सर्धा,चित्रकला स्पर्धा असे उपक्रम घेण्यात आले. त्या उपक्रमामधे सहभागी व नंबर आलेल्या विद्यार्थांना प्रोत्साहन पर बक्षीसे देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र सोळंके यांनी तर प्रास्ताविक गणित शिक्षक धिरज उसरबर्से तर शेवटी आभार निलेश विधळे यांनी मानले.
यावेळी अतुल देशमुख, ज्योती झाडे, सारिका वानखडे ,रविंद्र सोळंके,मयुरा कांडलकर, निलेश विधळे,धिरज उसरबर्से, गजानन मालवे, बाबाराव खंडाळे, राजेश कोल्हेकर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते अशी माहिती विद्यालयातील शिक्षक रविंद्र सोळंके यांनी दिली.