Monday, December 23, 2024
Homeराज्यसक्षम युवा कृषी उद्योजक घडविणारे कृष्णा व्हॅली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कृष्णा व्हॅली...

सक्षम युवा कृषी उद्योजक घडविणारे कृष्णा व्हॅली राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कृष्णा व्हॅली अडवान्सड ॲग्रीकल्चर फौंडेशनचा देशातील सर्वोत्कृष्ट ए.सी.अँड ए.बी. सी. प्रशिक्षण केंद्र या पुरस्काराने गौरव…

सांगली – ज्योती मोरे

कृष्णा व्हॅली अडवान्सड ॲग्रीकल्चर फौंडेशन ला राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे देशभरातील १५० पेक्षा अधिक संस्थांमधून सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षण संस्था २०२२ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा दि. १२ जानेवारी रोजी राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल नवी दिल्ली येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्राच्या एकूण १५ कृषी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. त्यापैकी ७ कृषी उद्योजक एकट्या कृष्णा व्हॅलीचे असून या घवघवीत यशामुळे संस्थेचा संपूर्ण देशभर नावलौकिक होत आहे.

देशातील कृषी उद्योजकांसाठी मॅनेज हैदराबाद हि सरकारी संस्था राष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ठ युवा कृषी उद्योजक जाहीर करते. त्यासाठी हि संस्था देशभरात त्यांनी जे उद्योजक घडविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र मंजूर केलेले आहेत. त्यामधील प्रशिक्षणाचा दर्जा व त्यांनी घडविलेले कृषी उद्योजक यांचे मूल्यांकन केले जाते.

सदर कार्यक्रमात कृष्णा व्हॅली मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या कृषी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. कु. सुचिता भोसले – कृषकमित्र शेतकरी समृद्धी केंद्र, मु. पो. कोडोली, सातारा , सौ.प्रियांका पाटील – प्रियांका फूड अँड नॅचरल मु. पो. कोडोली, कोल्हापूर, श्री.दस्तगीर जमादार – जमादार फार्म मशीनरी, मु. पो.हेरवाड, कोल्हापूर, श्री.संग्राम पाटील – कृष्णाकाठ ऍग्रो प्रोड्युसर कंपनी, मु. पो. खोडशी, सातारा, सौ.कल्पना प्रवीण माळी – ओयासिस ऍग्रो इंडस्ट्रीज, मु. पो. शिरोळ, कोल्हापूर, श्री.सुशांत घोणे – हायटेक लॅब आणि कार्पोरेशन, मु. पो. सांगली, सौ.सारिका पाटील – सिम्बायोसिस लॅब – मु. पो. कवलापूर यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तसेच धनादेश देऊन गौरव करण्यात आला.

सदर पुरस्कार केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सचिव श्रीमती. शुभा ठाकूर, मॅनेज ( नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एग्रीकल्चर एक्स्टेंशन मॅनेजमेन्ट) हैद्राबाद येथील महानिर्देशक डॉ. पी. चंद्रशेखरा, नाबार्डच्या महाव्यवस्थापक निवेदिता तिवारी, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मुख्य व्यवस्थापक शंतनू पेंडसे, सम्मुन्नती फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त संजय कुमार यांच्या हस्ते देणेत आला.

कृष्णा व्हॅली ॲग्रीकल्चर फौंडेशन हि संस्था कुपवाड औधोगिक वसाहतीत सन २००२ पासून स्थित आहे. मॅनेज हैद्राबाद द्वारे केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत सुरु केलेल्या ए सी ए बी सी प्रशिक्षण कृषी तसेच पशुवैद्यकीय पदवी व पदविका धारकांना देणेत येते. सदर संस्थेचे सांगली व्यतिरिक्त उत्तर (कोल्हापूर), सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव, बुलढाणा आणि नागपूर अशा विविध ठिकाणी शाखा सुरु आहेत.

या सर्व शाखा मार्फत आजतागायत सुमारे ८६०० युवकांना प्रशिक्षण देणेत आले असून त्यामध्ये सुमारे ६५०० युवकांनी आपापला कृषी उद्योग सुरु केलेले आहेत. हे आकडे देशाचे सर्व प्रशिक्षण संस्था मधील उचांकी आहेत आणि सदर पुरस्काराने सन्मानित करणेत येणे हि संस्थेसाठी गौरवान्वित करणारी आहे तसेच युवा कृषी पदवी आणि पदविकाप्राप्त विद्यार्थ्यांनी कृषी उद्योजक बनण्यासाठी सदर प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष एन जी कामत यांनी केले. सदर पुरस्कार वितरण प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणशेठ लुंकड, सचिव तथा नोडल ऑफिसर अब्दुलवहाब देवर्षी, समन्वयक शरद कांबळे याना सन्मानित करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: