पातूर : जलतज्ञ, कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते दादाराव देशमुख यांचे अकोला मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी मरणोत्तर देहदान करण्यात आले.काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७४ व्या वर्षी अकोला येथील खाजगी इस्पितळात निधन झाले .शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉ पंडित यांनी दिवंगत दादाराव देशमुख यांचे परीवारातील सर्वांच्या उपस्थितीत देहदान प्रमाणपत्र प्रदान केले.
ह्यावेळी वैद्यकीय शासकिय महाविद्यालयात तथा त्यांच्या राहत्या चरणगावला , स्वामी अक्षयानंद महाराज,शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख उपाध्यक्ष एड.गजानन पुंडकर, कोषाध्यक्ष अरुण इंगोले, जि.प. उपाध्यक्ष सावित्रीबाई हिरासिंग राठोड,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कृष्णाभाऊ अंधारे, शेतकरी नेते मनोज तायडे, समाज सेवक गजानन हरणे, मित्र बाबासाहेब देशमुख, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अशोक पटोकार, गटविकास अधिकारी गोपाल बोंडे , शेतकरी नेते सतिश देशमुख,रेडक्रास सोसायटी चे संदिप पुंडकर, डॉ केशव मेतकर,पातुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विष्णूपंत महल्ले,हिरासिंग राठोड, हिम्मतराव टप्पे, खरेदी विक्री संघाचे अरुण कचाले, पंजाबराव देशमुख,नानाराव देशमुख,ममता इंगोले,जि.प. सदस्य विनोद देशमुख,माजी सभापती पप्पु देशमुख, मनसे तालुकाध्यक्ष प्रशांत लोथे,
पातुर तालुक्यातील चरणगाव येथील दादाराव देशमुख यांनी तहयात शेतकऱ्यांना विषमुक्त शेती उत्पादन, शेतमालासाठी श्रमिक भारती शेतकऱ्यांची अकोला जिल्ह्यातील पहिली उत्पादन कंपनी, त्याबरोबरच पातुर तालुक्यातील नव्हे तर अकोला जिल्ह्यातील धरणांचे कालव्यातील पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचावे यासाठी जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांचा महासंघ स्थापन केला. त्यामध्ये प्रत्येक जलप्रकल्पातील पाणी वापर संस्थांना एक संघ केलं. निर्गुणा पाणी वापर शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम स्थापन केली होती.शासनाचे यासंबंधीची सर्व अधिकार शेतकऱ्यांना मिळवून दिले होते त्याबरोबरच पातुर नागरी पतसंस्था शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली.
सातत्याने आयुष्यभर शेतकऱ्यांच्या जीवनमान बदलण्यासाठी शासनाचे उंबरठा झिजवले. अनेक कृषिमंत्र्यांना शासनातील संबंधित खात्याच्या सचिवांना पातुर तालुका अकोला जिल्हा शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागाचे शेतकऱ्याच्या बांधावरील दौरे करण्यास भाग पाडले. लिंबू उत्पन्नावर उत्पादनाबाबत आंध्र प्रदेश राज्य सरकारला मार्गदर्शनही केले त्याबरोबरच राज्यातील अनेक मंत्री त्यांचं मार्गदर्शन घेत होते मात्र त्यांनी कोणतेही राजकीय पद न घेता आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ही ते शेतकऱ्यांसाठी धडपडत होते. आयुष्याच्या नंतर वैद्यकीय शासकिय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देह अभ्यासासाठी देहदान केला.
यावेळी त्यांची स्नुषा एड.भारती राजेश देशमुख यांनी सांगितले की दादासाहेबांनी केलेला संकल्प पूर्ण केला आपणही याचा आदर्श घ्यावा असावा त्यांनी यावेळी सांगितले केलं
काँग्रेस जिल्हाध्यक्षचे देहदान यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्णय घेतला.काळाची गरज लक्षात घेता समाजातून सर्वांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली.