Sunday, December 22, 2024
Homeसामाजिकशिर्ला भूमिपुत्राचा कोकणांत डंका...रायगड जिल्हा उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मान...

शिर्ला भूमिपुत्राचा कोकणांत डंका…रायगड जिल्हा उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मान…

पातूर : तालुक्यातील ग्राम शिर्ला येथील प्रवीण शेषराव गवई यांना उत्कृष्ट तलाठी म्हणून दि. ०७ ऑगस्ट, २०२३ रोजी महसूल सप्ताह उपक्रमाच्या सांगता समारोहानिमित्त वर्षभरात केलेल्या कामाच्या सन्मानार्थ माझा रायगड जिल्हास्तरीय “उत्कृष्ट तलाठी” म्हणून गौरव करण्यात आला.

यावेळी रायगड जिल्ह्याचे सन्मा. जिल्हाधिकारी श्री. योगेश म्हसे, भा.प्र.से. यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रायगड जिल्ह्यातील वरीष्ठ अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा पोलीस प्रशासनाचे सन्मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे, भा.पो.से. यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी आपण निस्वार्थपणे काम करीत गेलो की त्याची नोंद कुठे ना कुठे नक्कीच ठेवली जाते व त्याचे आपण अपेक्षा केलेल्या फळापेक्षाही उत्तम भेट आपल्याला मिळते. आजचा पुरस्कार हा माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून ती मला माझ्या भावी जीवनात अशाच पध्दतीने काम करण्याकरिता प्रदान केलेली उर्जा आहे, असे मी मानतो. हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझ्या एकट्याचा नसून मला प्रत्येकवेळी मार्गदर्शन करणा-या माझ्या वरीष्ठांचा आणि मला नेहमी सहाय्य करणा-या माझ्या सहका-यांचाही आहे. अशाच पध्दतीने आपण नेहमी माझी उमेद बनून माझ्या सोबत रहाल व सहकार्य कराल असे मनोगत यावेळी प्रवीण शेषराव गवई यांनी व्यक्त केले

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: