मुंबई – गणेश तळेकर
मराठी रंगभूमीवर ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे ‘नवनीत प्रॉडक्शन’ निर्मित व ‘सुबोध पंडे प्रॉडक्शन्स’ प्रकाशित बहुचर्चित नाटक , ३० वर्षांनी परत रंगभूमीवर सादर होत आहे, आज ही हे नाटक प्रेक्षकांना आवडते आहे , तरुण पिढीने नक्की हे नाटक पाहावे…!
दिनांक : ३० – ६ – २०२४ रोजी, माहीम-माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर नव्याने सुरु झाल्यावर, या नाटकाचा येथे पहिलाच प्रयोग प्रचंड उत्साहात , प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्यांच्या गजरात संपन्न झाला. या प्रयोगाचे औचित्य साधून सदर नाट्यप्रयोगाच्या आधी कलाकारांशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ‘नवनीत प्रॉडक्शन’ ‘सुबोध पंडे प्रॉडक्शन्स’यांची निर्मिती असलेले नाटक नक्की पहा आणि विचार करा… कोण ? म्हणतो टक्का दिला…?
‘कोण म्हणतं टक्का दिला?’ हे मराठी नाटक आता नव्याने रंगभूमीवर आले आहे.’नवनीत प्रॉडक्शन’ निर्मित व ‘सुबोध पंडे प्रॉडक्शन्स’ प्रकाशित या नाटकात अनिकेत विश्वासराव, प्रिया मराठे, सुबोध पंडे, संयोगिता भावे, राहुल पेठे व पल्लवी वाघ-केळकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ या नाटकाचे लेखन संजय पवार यांनी केले असून, सुबोध पंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.
शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, अजित परब यांचे संगीत व मंगल केंकरे यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. मृणालिनी पंडे, वैभव पाटील व अमोल परब हे या नाटकाचे सहनिर्माते आहेत.
महाव्हॉईस न्युज
उप संपादक – गणेश तळेकर
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :- 9224703181.