पचायंत समिती सदस्य मयुर उमरकर व पाटबंधारे विभागाकडुन आज पाहणी
अतुल दंढारे – नरखेड
सततच्या मुसळदार पावसाने वर्धा नदी तुडुंब भरून वाहत आहे. दिनांक 13 ला वर्धा नदीला मोठा पुर आला त्यामध्ये नरखेड तालुक्यातील खरबडी गावामध्ये वर्धा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधारा वाहून गेला. या बंधाऱ्याच्या रुंदीकरणासाठी मागील वर्षी एक कोटी वीस लक्ष रुपये एवढा निधी खर्च झाला. खरबडी च्या शेतकऱ्याची शेती नदीपलीकडे असुन ते याच बंधाऱ्यावरून वहिवाट करत असतात परंतु आता शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहील आहे.
सदर बातमी गावकऱ्यांनी पंचायत समिती सदस्य मयुर उमरकर यांना सांगितली त्यांनी लगेच पाटबंधारे विभाग काटोल यांना सुचना दिली उपअभियंता भागवतकर व कनिष्ठ अभियंता बांधरे यांनी पाहणी करून यावर लवकरच उपाययोजना करू असे सांगितले.
यावेळी पं. स. सदस्य मयुर उमरकर सरपंच ग्रा. खरबडी साधना राऊत, उपसरपंच गुणवंत काळे, रामभाऊ ठाकरे राजकुमार पांडव, रामराव राऊत, घनश्याम पांडव, गौरव चौधरी, रोशन काळे, पंकज घोरपडे, अंकित पांडव, स्वप्नील ठाकरे, प्रज्ञेश घोरपडे, भुषण सोनोने महादेव सोनवणे, आशिष सोनवणे, सुरेश घोरपडे, प्रवीण राऊत, बबनराव राऊत भुषण पांडव व मोठ्याप्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.