Monday, December 23, 2024
HomeMarathi News TodayKL Rahul-Athiya Marriage | केएल राहूल आणि अथिया लवकरच लग्नबंधनात अडकणार...

KL Rahul-Athiya Marriage | केएल राहूल आणि अथिया लवकरच लग्नबंधनात अडकणार…

KL Rahul-Athiya Marriage – भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी यांच्या लग्नाची उत्सुकता सर्वांनाच आहे. दोघं लग्न करणार असल्याच्या सोशल मिडीयावर चर्चा होतात पण आता बीसीसीआयच्या सूत्रांवर विश्वास ठेवला तर लवकरच सुनील शेट्टीच्या घरी सनई वाजवली जाणार आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, की केएल राहुल आणि अथिया शेट्टी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पुढील वर्षी जानेवारी 2023 मध्ये हे जोडपे लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. टी-२० वर्ल्ड कपनंतर त्यांचे लग्न होणार आहे.एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, हे कपल महाराष्ट्रात लग्नगाठ बांधणार आहे.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची चाहत्यांना इतकी उत्सुकता आहे की, या जोडीबद्दल दररोज कोणत्या ना कोणत्या अफवा उडताना दिसत आहेत. यापूर्वी, केएल राहुल आणि अथिया शेट्टी एकाच घरात शिफ्ट झाले आहेत आणि लग्नापूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मुंबईतील कार्टर रोडवर त्यांचे घर आहे.

लिव्ह-इनच्या या बातम्या समोर आल्यावर, राहुल आणि अथियाच्या लग्नाच्या बातम्यांनी पुन्हा जोर पकडला असताना, सुनील शेट्टीने याबाबतचे सत्य बोलून दाखवले आहे. इन्स्टंट बॉलीवूडशी संवाद साधताना तो म्हणाला, “मला वाटतं मुलांनी ठरवल्याबरोबर, राहुलकडे आशिया कप, वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका टूर, ऑस्ट्रेलिया टूर आहे, मुलांना ब्रेक मिळाला की लग्न होईल. बाकी दिवशी लग्न करू शकत नाही.” रिपोर्ट्सनुसार, टी-20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथून परतल्यानंतर दोघेही महाराष्ट्रात विवाहबंधनात अडकणार आहेत.

सुनील शेट्टीच्या शेवटच्या वक्तव्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, सध्या राहुल त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. करिअरमधून वेळ मिळाल्यावरच लग्नाची तयारी केली जाईल. असेही सांगितले जात आहे की अथिया तिच्या आगामी चित्रपट प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत दोघांच्या लग्नाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांची निराशा होऊ शकते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: