Monday, December 23, 2024
HomeSocial Trendingके एल राहुल आणि अथिया शेट्टी 'या' दिवशी लग्नबंधनात अडकणार…

के एल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ दिवशी लग्नबंधनात अडकणार…

टीम इंडियाचा आणखी एक स्टार फलंदाज के एल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत केएल राहुलची टीम इंडियात निवड न झाल्यामुळे असे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, राहुल आणि अथिया 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत.

कौटुंबिक कारण सांगून बीसीसीआयकडे रजा मागितली
केएल राहुलने लग्नासाठी सुट्टी घेतली आहे. केएल राहुल न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत भाग घेणार नाही. कौटुंबिक कारण सांगून त्याने बीसीसीआयकडे रजा मागितली आहे.

अथिया ही सुनील शेट्टी यांची एकुलती एक मुलगी आहे.
अक्षर पटेलनेही कौटुंबिक कारण सांगत रजा मागितली आहे. तोही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं बोललं जात आहे. बीसीसीआयने ट्विट करून याची माहिती दिली आहे. बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील आलिशान बंगल्यात केएल राहुल आणि अथियाचे लग्न होणार असल्याचा दावाही अनेक रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. अथिया ही सुनील शेट्टी यांची एकुलती एक मुलगी आहे. आपल्या मुलीचे लवकरात लवकर लग्न व्हावे, असे सुनीलने गेल्या वर्षी सांगितले होते.

केएल राहुल आणि अथिया शेट्टी बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेक प्रसंगात एकत्र दिसत दिसलेत. अथिया विदेश दौऱ्यावरही राहुलसोबत असते.

केएल राहुल एका नव्या भूमिकेत दिसला
यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या अपघातानंतर केएल राहुल टीम इंडियामध्ये विकेटकीपर म्हणून खेळत आहे. शुभमन गिल सलामीवीर म्हणून खेळत असल्याने त्याला फलंदाजीच्या क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर उतरवले जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात राहुलने उपयुक्त धावा केल्या.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: