मुंबई – गणेश तळेकर
उपरोक्त संस्थेच्या वतीने फक्त भंडारी समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदविका धारक तसेच इतर उच्च शिक्षण परिक्षा उत्तीर्ण झालेल्या “विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा” लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रवेश अर्ज भरणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज कित्ते भंडारी ऐक्यवर्धक मंडळी संस्थेचे कार्यालय, दादर, मुंबई येथे उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या संधीचा लाभ घ्यावा.
पात्रता :
दहावी उत्तीर्ण – टक्केवारी ७०%
बारावी उत्तीर्ण – टक्केवारी ६५%
पदवी, पदविका धारक – टक्केवारी ६०% दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची अट शिथिल करण्यांत आलेली आहे. दिव्यांग विद्यार्थ्यानी पहिल्या प्रयत्नांत उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, दिव्यांग दाखल्याची तसेच भंडारी ज्ञातीच्या दाखल्याची छायांकित प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.🙏
(शैक्षणिक वर्ष : २०२२–२०२३)
वि. सू. प्रवेश अर्जासोबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ची मूळ गुणपत्रिकेची आणी भंडारी ज्ञातीच्या दाखल्याची नक्कल प्रत जोडणे आवश्यक आहे. गुणपत्रिकेच्या पाठीमागे प्राप्त झालेल्या प्रत्येक विषयांचे क्रमवार गुण लिहून टक्केवारी लिहिणे आवश्यक आहे.
कार्यालयाचा पत्ता : कित्ते भंडारी सभागृह, शिवसेना भवन जवळ, गोखले रोड (उत्तर), दादर, मुंबई-४०००२८
कार्यालयाची वेळ : सकाळी १०:०० ते रात्री ७:०० वाजेपर्यंत
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १५ जुलै २०२३
आपला नम्र,
श्री. शेखर ग.कीर
(कार्यवाह, कि.भं.ऐ.मंडळी, दादर, मुंबई)
भ्रमणध्वनी : ७७३८९३४६९१
संपर्क : कित्ते भंडारी सभागृह, दूरध्वनी क्र. ०२२२४४५३७७९, ०२२२४४६०७५२
निमंत्रक:- “विद्यार्थी गुणगौरव समिती” कि.भं.ऐ.मंडळी, दादर
१) श्री. संतोष बा. मांजरेकर – ८३५५९४७३११
२) श्री. संजय शं. भरणकर – ९८२०५१४९५८
३) श्री. अरविंद रा. सुर्वे – ९८७०९०१२१८
४) श्री.दत्तात्रय ग.सुर्वे – ९८६९३७५६६९ ५) श्री. पंकज प्र. मोरे – ९९२०६३८०६९